Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : मुलावरील हल्ल्याच्या 'कट-कारस्थाना'वर मंत्री विखे संतापत थोरातांचा बापच काढला...

Radhakrishna Vikhe vs Balasaheb Thorat: भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्यावरील हल्ल्याच्या कटाचा आरोप करत मंत्री राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांवर गंभीर आरोप केले.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : संगमनेरमधील जाळपोळमागील राजकीय झळा आता उग्र होऊ लागल्यात. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आता संगमनेरच्या मैदानात उतरले आहेत. मंत्री विखे यांनी पुत्र माजी खासदार सुजय विखे यांच्यावर हल्ल्याच्या कट-कारस्थानावरून चांगलेच संतापले.

मंत्री विखे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा बापच काढला. 'संगमनेर तालुका तुमच्या बापाची इस्टेट नाही, विखेंना गावबंदी करायला. तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका', असा जोरदार निशाणा मंत्री विखे यांनी साधला आहे.

संगमनेरमधील जाळपोळनंतर भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे यांनी थोरात आणि काँग्रेस समर्थकांवर गंभीर आरोप केला. 'माझ्यावर हल्ल्याचा पूर्वनियोजित कट होता, त्यांच्या यंत्रणेतील माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याने वाचलो', असा दावा सुजय विखेंनी केला. सुजयसाठी त्यांचे वडील मंत्री विखे संगमनेरच्या मैदानात उतरले आहेत. बाळासाहेब थोरातांना आव्हान देत संताप व्यक्त करत आहेत.

काठ्या-कुऱ्हाडी घेऊन आले होते

मंत्री विखेंनी काँग्रेसचे (Congress) थोरात यांच्यावर निशाणा साधताना विखेंना गावबंदी आणि तालुका बंदी करण्याची भाषा करताय, तर संगमनेर तालुका तुमच्या बापाची इस्टेट नाही, तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिला. तर वसंतराव देशमुख याच्या विधानामागे राजकीय षडयंत्र असू शकते. विधान केल्यानंतर अर्ध्यातासात थोरातांचे गुंड गोळा झाले. थोरातांचा पीए, त्यांचे भाऊ इंद्रजीत थोरात यांच्या गाडीत काठ्या कुऱ्हाडी होत्या. त्यांना डॉ. सुजयवर प्राणघातक हल्ला करायचा होता.

मास्टरमाईंडचा शोधावा

सुजय विखेंची संगमनेर तालुक्यात लोकप्रियता वाढली असून, थोरात बालेकिल्ल्यात सुजयच्या उच्चांकी सभा होताय. यामुळे थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतक्या वर्ष त्यांनी दहशत माजवून निवडणुका जिंकल्यात. एकीकडे स्वतःला सुसंस्कृत म्हणता आणि दुसरीकडे राजकीय दहशतवाद सुरू. याचा मास्टरमाईंड पोलिसांनी शोधावा, अशी मागणी केल्याचेही मंत्री विखे यांनी म्हटले.

सुजयची माफी कोण मागणार

जयश्री थोरात स्वतःला याप्रकरणात ओढवून घेत आहेत. त्यांनी यात न पडलेले बरं. त्यांच्या वडिलांचा तालुक्यातील दहशतवादाचा चेहरा समोर आला आहे. जयश्रीताई फार छोट्या आहेत. त्यांना अजून फार शिकायचं आहे, असे सांगून सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता. त्याची माफी कोण मागणार?, असा सवाल देखील मंत्री विखे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT