Nashik News : भाऊबीजेलाच नाशिकच्या घोलप कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आलाय.
माजी मंत्री बबन घोलप यांनी राजकीय ईर्ष्येतून आपल्या धाकट्या लेकीला जाहीर नोटीस काढलीय. या जाहीर नोटिशीची नाशिकच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
'तनुजा ऊर्फ दिपाली घोलप यांना काढलेल्या नोटीसीमध्ये आपला विवाह झाला असल्यानं आपण माहेरचे नाव न लावता सासरकडील नाव लावावे', असं बबन घोलप यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाकडून योगेश घोलप यांना उमेदवारी मिळाली आहे. यावेळी बबन घोलप यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत योगेश घोलप यांच्यासाठी प्रचारात सरसावले आहे.
याच दरम्यान तनुजा घोलप यांनी नाशिकच्या (Nashik) देवळालीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे घोलप कुटुंबातील राजकारण आणि जाहीर नोटीसीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
बबनराव घोलप यांनी गेल्या आठवड्यातच तनुजा घोलप यांनी माझ्या नावाचा कुठल्याही प्रकारे वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला होता. तनुजा घोलप यांचे पतीकडील अडनाव हे भोईर आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून तनुजा या माहेरकडील अडनावाचा उल्लेख करत होत्या. याची दखल बबनराव घोलप यांनी घेत, लेकीला नाव न वापरण्याचा सल्ला दिला होता. तसेच नाव वापरू नये म्हणून कायदेशी कारवाईचा देखील इशारा दिला होता.
तनुजा या भाजपच्या पदाधिकारी आहेत. तसेच त्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. उद्या चार नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी त्या निवडणुकीच्या रिंगणात राहताता की, बाहेर पडतात हे स्पष्ट होईल. तत्पूर्वी त्यांना त्यांचे वडील माजी मंत्री बबनराव घोलप यांनी नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या राजीनामा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.