Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी जरांगेंना पुन्हा डीवचले म्हणाले, "जरांगे फॅक्टर आहे कुठे"

Chhagan Bhujbal Challenges Manoj Jarange: येवला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कार्यकर्ते मला प्रचाराला येऊ देत नाहीत, असे विधान मंत्री भुजबळ यांनी केले.
Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Yevla Assembly Constituency: विधानसभा निवडणूक जोरात आहे. अशा स्थितीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मंत्री भुजबळ यांनी पुन्हा एकदा डिवचले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे विरूद्ध भुजबळ राजकीय नाट्याचा अंक पहायला मिळू शकतो.

येवला मतदार संघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र एकंदरच विरोधकांनी दिलेले उमेदवार आणि निवडणुकीचा प्रचार याबाबत मंत्री भुजबळ निश्चिंत वाटतात. मंत्री भुजबळ यांनी गेले सहा महिने आधीच निवडणुकीची यंत्रणा सक्रिय केली होती.

मंत्री छगन भुजबळ यांचा प्रचार आणि जमवाजमव देखील यापूर्वीच पूर्ण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर निश्चित असलेले भुजबळ नाशिकला आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, मला कुठेही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट दिसत नाही. या निवडणुकीत मला कोणतीही अडचण नाही. त्यामुळे मी निश्चिंत असल्याचा दावा त्यांनी केला.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Dada Bhuse Politics: मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात जिवलग मित्राचे शक्ती प्रदर्शन चर्चेत!

कार्यकर्ते तर मला मतदारसंघात प्रचाराला देखील येऊ देत नाहीत. त्यामुळे मतदारसंघाबाहेर निश्चित आहे. यंदाच्या निवडणुकीत जो कोणी मला प्रचाराला बोलावेल, त्याच्या प्रचाराला मी जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

येवला मतदार संघात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांसह विविध प्रबळ उमेदवार देखील मैदानात आहेत.

या उमेदवारांना मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, याची प्रतीक्षा आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या पुढील तीन दिवसात याबाबत प्रचाराची दिशा आणि भुजबळ विरोधकांचा उमेदवार कोण? हा निर्णय होणार आहे. त्या दृष्टीने सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Kishor Patil : आमदार किशोर पाटील करतात तरी काय? संपत्तीत ४५ कोटींची वाढ!

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार छगन भुजबळ देखील कदाचित मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, या प्रतीक्षेत असावेत. सध्या तरी त्यांना आपला प्रमुख विरोधक कोण? हे निश्चित नसावे. ही निवडणूक मंत्री भुजबळ यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील या दोघांनीही छगन भुजबळ यांना टार्गेट केले आहे. मात्र समन्वयाअभावी त्यांना योग्य उमेदवार आणि प्रचारातील दिशा निश्चित करता आलेली नाही, असे दिसते.

माजी खासदार भुजबळ अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत मंत्री भुजबळ म्हणाले, त्यांनी यापूर्वीच पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सर्व काही सोडल्यानंतरच त्यांनी ही उमेदवारी केली. या मतदार संघात सध्या प्रचार चांगलाच रंगला आहे. अनेक गैरप्रकार देखील होत आहेत.

आमदार कांदे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्याबद्दलही भुजबळ यांनी आपले मतप्रदर्शन केले. ते म्हणाले, निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांना विरोधक म्हणून पहावे. शत्रू म्हणून पाहू नये. कोणी गैरप्रकार केला तर, त्याच्यावर कारवाई निश्चितच होते. निवडणुकीचा उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात झालेलाच बरा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com