Pratibha Pachpute  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrigonda Constituency : उमेदवारी मिळाली, तरी प्रतिभा पाचपुतेंची 'सागर' बंगल्याकडे धाव; भाजप काय निर्णय घेणार?

Pratibha Pachpute meet Devendra Fadnavis : भाजपने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. परंतु 'या' कारणासाठी त्यांनी मुंबईत पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेट घेतली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारांच्या पहिल्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश केलाय. श्रीगोंदा मतदारसंघात भाजपने वेगळाच निर्णय घेतल्याने, त्याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु प्रतिभा पाचपुते यांनी मुलाला उमेदवारी मिळावी, यासाठी मुंबई पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. यात काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.

भाजपने (BJP) काल 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात 13 महिलांना स्थान देण्यात आलं आहे. अहिल्यानगरमधील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील विद्यमान आमदार मोनिका राजळे आणि श्रीगोंदा मतदार संघातील आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांचा उमेदवारांमध्ये समावेश होता.

आमदार बबनराव पाचपुते यांनी मुलासाठी उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. परंतु पक्षाने त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेवादवारी दिली. बबनराव पाचपुते वयोमानाने आणि आजारी असल्याने त्यांनी पक्षाकडे परिवारातील एकाला कोणाला, तरी उमेदवारी देण्याची मागणी केली. यात मुलाचे नाव पुढं रेटण्यात आलं. परंतु पक्षाच्या पहिल्या यादीत बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांचे नाव आले.

पक्षाने घेतलेल्या या निर्णयाचा धक्का बबनराव पाचपुते यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना बसला आहे. या निर्णय फिरवण्यासाठी आता पाचपुते परिवार मुंबईत दाखल झाला आहे. तिथं सागर बंगल्यावर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं काय झालं? पाचपुतेंकडून कोणता प्रस्ताव ठेवण्यात आला? पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतला? याकडे आता लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT