Ahilyanagar Assembly BJP Candidate : विखे, राजळे, कर्डिले, पाचपुते, शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब; मैदान कसं मारणार?

Assembly election 2024 BJP has confirmed five candidates in the list of first 99 candidates in Ahilyanagar district : भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या 99 जणांची यादी जाहीर केली असून, त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे.
Ahilyanagar Assembly BJP Candidate
Ahilyanagar Assembly BJP CandidateSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रतिभा पाचपुते, माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

शिर्डीमधून राधाकृष्ण विखे

भाजपच्या पहिल्या यादीत भाजप नेते महसूल तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यांचा राहाता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदार संघ आहे. मंत्री विखे भाजपमधील प्रमुख नेते असल्याने त्यांच्यावर राज्यातील काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे मतदार संघात तळ ठोकून आहेत.

Ahilyanagar Assembly BJP Candidate
Sanjay Raut : ''मविआ' आजारी नाही, पण 'एक्स-रे' करावा लागणार'; संजय राऊतांना नेमकं काय सुचवायचंय

राधाकृष्ण विखे पूर्वी काँग्रेसमध्ये (Congress) होते. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. आता ते पहिल्यांदा भाजपच्या चिन्हावर निवडणुकीला समोरे जाणार आहे. काँग्रेसने मतदार संघावर दावा कायम ठेवला असल्याने, मंत्री विखेंविरोधात काँग्रेस कोणता चेहरा देईल, याकडे आता लक्ष लागलं आहे. दरम्यान, मंत्री विखेंना भाजपकडून विरोध होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असलेले भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी मंत्री विखेंच्या उमेदवारीला विरोध केला होता.

Ahilyanagar Assembly BJP Candidate
Chandrashekhar Bawankule Vs MVA : बावनकुळेंनी टायमिंग साधलं, 'मविआ'त हाणामारी सुरू

कर्जत-जामखेडमधून आमदार शिंदे

भाजप नेते माजी मंत्री आमदार राम शिंदे यांना देखील पहिल्या यादीत स्थान मिळालं आहे. त्यांना कर्जत-जामखेडमधून उमेदवारी जाहीर झाली. 2019 मध्ये त्यांचा रोहित पवारांकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर त्यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख आहे.

शेवगाव-पाथर्डीमधून आमदार राजळे

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा संधी मिळाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या त्या विश्वासू आहेत. पंकजा मुंडे पाथर्डीला आपली 'मावशी' मानतात. असं असलं तरी आमदार राजळे यांना पक्षांतंर्गत मोठा विरोध आहे. पक्षातील विरोधकांवर मात करत त्या पुन्हा विजयाला गवसणी कशी घालतात, याची उत्सुकता राहणार आहे.

राहुरी-नगरमधून शिवाजी कर्डिले

नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना भाजपने राहुरी-नगर विधानसभा मतदार संघातून पुन्हा संधी मिळाली. 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. शिवाजी कर्डिले यांना या पराभवाचा वचपा घ्यायचा आहे. यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात पायाला भिंगरी लावून फिरत आहे.

श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते

ज्येष्ठ नेते भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. श्रीगोंदा मतदार संघातून त्या पहिल्यांदाच आमदारकीला समोरे जाणार आहे. बबनराव पाचपुते वयोमानानं थकल्यानं आणि आजारपणामुळं भाजपने त्यांच्याच पत्नी प्रतिभा पाचपुते यांना संधी दिली. पाचपुते यांचा या मतदार संघावर चांगली पकड आहे. प्रतिभा पाचपुते या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. त्यांना राजकीय अनुभव आता आमदारकी लढवताना उपयोग ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com