Raksha Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Muktainagar Constituency : भावजय करणार नणंदेविरोधात प्रचार; मुक्ताईनगरमध्ये धमाल उडणार

Minister Raksha Khadse will campaign against Jalgaon district Muktainagar constituency candidate Rohini Khadse : जळगावमधील मुक्ताईनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्याविरोधात त्यांची भावजय भाजप नेत्या मंत्री रक्षा खडसे प्रचारात उतणार.

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघ खडसे कुटुंबीयांमधील महिलांच्या राजकीय संघर्षाने ढवळून निघणार आहे. खडसे कुटुंबातील दोन महिला सदस्य प्रचारदरम्यान आमने-सामने येणार आहे.

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर खडसेंच्या स्नुषा आणि भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्या. त्यानंतर त्यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यावेळी रोहिणी खडसे यांनी आपल्या पक्षाशी प्रचार धुरा सांभाळताना आपल्या भावजयी विरोधात प्रचार केला होता. आता मात्र उलटी स्थिती आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून रोहिणी खडसे या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून आमदार चंद्रकात पाटील उभे आहेत. खडसे आणि पाटील दोघांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे.

लोकसभेनंतर आता विधानसभेत रोहिणी खडसेविरुद्ध रक्षा खडसे, असा सामना प्रचारात रंगणार आहे. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटलांच्या प्रचारात भाजप (BJP) मंत्री रक्षा खडसे सक्रिय असणार आहेत. पक्षादेश पळून महायुतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांचा प्रचारात असेल. आमदार चंद्रकांत पाटील यांनी माझ्याशी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा केलेली नाही. तरीपण मी भाजपची कार्यकर्ता असल्याने महायुतीचे उमेदवार म्हणून मी त्यांच्या प्रचारात असेल, असे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा प्रचार केला होता. श्रीराम पाटील यांच्याविरोधात त्यावेळी रक्षा खडसे या उमेदवार होत्या. रक्षा खडसे या निवडून आल्या. आता मात्र विधानसभा निवडणुकीत परिस्थिती उलटी आहे. रोहिणी खडसे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार आहे आणि प्रचार मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे आहे. त्यामुळे खडसे कुटुंबीयांमधील दोन महिला सदस्यांचे राजकारण कोणत्या टोकाला जाते, याची उत्सुकता मुक्ताईनगर मतदारसंघात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT