Manoj Jarange Patil: आमदार सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्या, पोहोचले जरांगेंच्या दारी!

Maratha Mahasangh Candidate Dr. Rohan Borse: मराठा महासंघाने नांदगाव मतदारसंघात डॉ रोहन बोरसे यांना उमेदवारी जाहीर केल्याने प्रस्थापित उमेदवारांच्या अडचणी वाढल्या.
Sameer Bhujbal, Suhas Kande with Jarange Patil & Dr Rohan Borse
Sameer Bhujbal, Suhas Kande with Jarange Patil & Dr Rohan BorseSarkarnama
Published on
Updated on

Nandgaon Assembly constituency: नांदगाव मतदार संघात यंदाची निवडणूक चुरशीची आहे. याची जाणीव मतदारांनाही होऊ लागली आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना बंडखोरांनी आव्हान दिले आहे. या स्थितीत कांदे कोणाची मदत घेतात याची उत्सुकता आहे.

नांदगाव मतदार संघात जवळपास ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे प्रमुख उमेदवार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राजीनामा देऊन उमेदवारी करणारे माजी खासदार समीर भुजबळ यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे.

या निमित्ताने नांदगाव मतदार संघात ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली आहे. त्यात प्रचंड चुरस आहे. त्यामागे भुजबळ आणि कांदे यांच्यातील राजकीय वैर कारणीभूत आहे. अशा स्थितीत या दोघांनाही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठेचे बनले आहे.

त्यात मराठा महासंघाने डॉ रोहन बोरसे यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे. मराठाआरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पाठींबा असेल, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे एक नवा अँगल निर्माण झाला आहे.

Sameer Bhujbal, Suhas Kande with Jarange Patil & Dr Rohan Borse
Maharashtra Election: भाजप, काँग्रेस बंडखोरीने घायाळ, खानदेशात ३५ पैकी १९ मतदारसंघात बंडखोरीचे पिक!

यामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही करण्याची तयारी असलेल्या आमदार कांदे यांनी काल आपल्या समर्थकांनाही चांगलाच धक्का दिला. दिवसभर प्रचार केलेले आमदार कांदे रात्री थेट मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले.

नांदगाव मतदारसंघात मराठा आरक्षणाला विरोध करणारे भुजबळ यांचे कुटुंबीय उमेदवार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी त्यांच्या पराभवासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी त्यांनी काही मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील बरोबर नेले होते. मात्र जरांगे पाटील यांनी त्याबाबत काहीही प्रतिसाद दिला नसल्याचे कळते. आमदार कांदे कोणतिही रिस्क घेण्यास तयार नाही, असे यातून स्पष्ट होते.

Sameer Bhujbal, Suhas Kande with Jarange Patil & Dr Rohan Borse
Kishor Patil : आमदार किशोर पाटील करतात तरी काय? संपत्तीत ४५ कोटींची वाढ!

जरांगे पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यावी याबाबतचा निर्णय अद्याप जाहीर केलेले नाही. त्यांच्या निर्णयाला नांदगाव आणि येवला या दोन्ही मतदारसंघात मोठे महत्त्व आहे. येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ आणि नांदगाव मतदार संघात माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार आहेत.

या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या मतदार संघात ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होत आहे. त्यामध्ये मराठा महासंघाने डॉ बोरसे यांना पुरस्कृत केले आहे. डॉ बोरसे हे स्थानिक उमेदवार आहेत, असा दावा ते करतात.

महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गणेश धात्रक हे देखील स्थानिक उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीला सामाजिक आणि राजकीय दोन्ही दृष्टीने वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत. त्या दृष्टीने प्रचंड चुरशीची आणि राजकीय संघर्ष असलेली निवडणूक आता मनोज जरांगे यांच्या दारी पोहोचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com