ATS Investigation in Shrirampur Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ATS Investigation in Shrirampur : पाकिस्तानशी संबंधित रिल्स पाहणं पडलं महागात? श्रीरामपुरात ATSची धडक कारवाई; 4 तरुणांची चौकशी, नोटिसाही बजावल्या!

ATS launches major probe Shrirampur over suspicious social media activity linked Pakistan-related content; notices issued four youths : अहिल्यानगर, मुंबई, नाशिक आणि धुळे येथील ATS पथकाने संयुक्त कारवाई केली असून, चार तरुणांच्या सोशल मीडिया व्यवहारांची सखोल तपास सुरू करण्यात आली आहे.

Pradeep Pendhare

Shrirampur ATS Probe : पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया रील्स पाहणे आणि त्यावर आक्षेपार्ह स्वरूपाच्या प्रतिक्रिया नोंदविल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी चौकशी मोहीम सुरू केली आहे.

या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर, मुंबई, नाशिक (Nashik) आणि धुळे येथील ATSच्या संयुक्त पथकाने पहाटेपासून श्रीरामपूर शहरातील विविध भागांत पडताळणी आणि चौकशी मोहीम हाती घेतली. प्राथमिक तपासात चार तरुणांची सखोल चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणांच्या सोशल मीडिया (Social Media) खात्यांचा तपशील, त्यांनी पाहिलेला व शेअर केलेला मजकूर, तसेच त्यांच्या ऑनलाइन व्यवहारांची तपासणी केली जात आहे. डिजिटल उपकरणांमधील माहिती आणि सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटीचीही पडताळणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ATSची ही कारवाई केवळ श्रीरामपूर शहरापुरती मर्यादित नसून तालुक्यातील काही ग्रामीण भागातही चौकशी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. काही व्यक्तींकडून आवश्यक कागदपत्रे आणि डिजिटल माहिती मागविण्यात आली असून त्याचे विश्लेषण केले जात आहे.

या संपूर्ण कारवाईमुळे श्रीरामपूरसह जिल्हाभरात चर्चांना उधाण आले आहे. चौकशीमागील नेमके कारण काय, संबंधितांवर पुढे कोणती कायदेशीर कारवाई होणार का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, ATS किंवा स्थानिक पोलिस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

सुरक्षा यंत्रणांकडून सोशल मीडियावरील देशविरोधी, भडकावू किंवा संशयास्पद स्वरूपाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे या कारवाईतून अधोरेखित झाले आहे. तथापि, श्रीरामपूरातील या चौकशीचा अंतिम निष्कर्ष काय निघतो आणि नोटिसा बजावण्यामागील नेमकी कारणे काय आहेत, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT