Ayodhya Ram Mandir Donation Scam: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी आणि मौल्यवान वस्तूंच्या अपहाराचा वाद सुरू आहे. देशभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने या संदर्भात चौकशीसाठी एसआयटी नियुक्त केली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगीचा अपहार आणि गैरव्यवहार झाला. त्यावर साधूंची शीर्ष संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने संताप व्यक्त केला होता. आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीराम मंदिराचे व्यवस्थापन ताब्यात देण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर मंदिराचे प्रमुख विश्वस्त चंपत राय यांच्यासह दोघांना राजीनामे देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले होते. हे राजीनामे नुकतेच स्वीकारण्यात आले. त्यांच्या रिक्त झालेल्या पदांबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याचे ट्रस्ट कडून सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजय दास यांनी या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. संबंधितांचे राजीनामे मंजूर झाल्याने चांगला संदेश जाईल. अयोध्येतील श्रीराम मंदिर हे भारतासह जगभरातील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे देणगी अपहाराची घटना खेदजनक आहे, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकारने या संदर्भात एसआयटी स्थापन केली आहे. हा निर्णय योग्य झाला आहे. एसआयटीच्या चौकशीतून देणगी अपहारातील वास्तव समोर येईल. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही चौकशी झाली पाहिजे. कारण कोट्यावधी भाविकांचा त्याच्याशी संबंध जोडला गेला आहे.
आखाडा परिषदेने देणगी अपहारावर आक्रमक होत मंदिर व्यवस्थापनाच्या ताब्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रवक्ते आणि हनुमान गढी येथील महंत संजय दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व देण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.