Ram Mandir FIR : अयोध्येतील राम मंदिरात देणगी अपहारप्रकरण; ‘श्रीराम ट्रस्ट’ची मोठी कारवाई; 8 जणांविरोधात FIR दाखल

FIR filed against 8 accused after SIT probe reveals alleged financial irregularities in Ayodhya Ram Mandir donation management : एसआयटीच्या प्राथमिक अहवालात गंभीर निष्कर्ष; मुख्यमंत्री निर्देशानंतर उत्तर प्रदेश सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये येताच कथित आर्थिक अपहार प्रकरणात आता अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ram Mandir FIR
Ram Mandir FIRSarkarnama
Published on
Updated on

Ram Mandir Donation Scam : अयोध्येतील राम मंदिर येथील देणगी व्यवस्थापनावरून मोठा वाद समोर आला असून कथित आर्थिक अपहार प्रकरणात आता अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालानंतर आठ आरोपींसह काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आल्याने या प्रकरणाने राष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी (Police) ही कारवाई केली. एसआयटीने प्राथमिक तपासात काही गंभीर अनियमितता आढळल्याचा अहवाल दिल्यानंतर ट्रस्टने थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणात रामाशंकर यादव उर्फ टिन्नू, अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, मनीष यादव, रामाशंकर मिश्रा, सुभाष आणि करुणेश यांच्यासह एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या निर्देशानुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यात विश्वासघात, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Ram Mandir FIR
Ayodhya Ram Mandir Donation Scam : राम मंदिरात मोठा घोटाळा? दान चोरी प्रकरणात 40 कर्मचारी हटवले; योगी सरकारकडे SIT चा 150 पानी अहवाल

सूत्रांच्या माहितीनुसार, मंदिरात जमा झालेल्या देणग्यांच्या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने 13 जून रोजी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. एसआयटीच्या प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे पुरावे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली.

Ram Mandir FIR
Shiv Sena Leader Fraud Case : एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा कारनामा; तीन मृत व्यक्ती जिवंत दाखवत जमीन लाटली, पोलिसही चक्रावले

या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री स्तरावरून थेट निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत एफआयआर दाखल केला. देशभरातील करोडो रामभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील देणगी व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या प्रकरणाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com