Bachchu-Kadu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bacchu Kadu Politics: बच्चू कडू म्हणाले, माझ्यावर ३५० गुन्हे दाखल आहेत, हजार झाले तरी शेतकऱ्यांसाठी लढणे थांबवणार नाही!

Bacchu Kadu criticize Girish Mahajan, Girish Mahajan is BJP Crisis solver, nothing done for farmers-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे तर भाजपचे संकटमोचक आहेत, ते केळी उत्पादक शेतकऱ्यांचे संकटमोचक होऊ शकले नाही!

Sampat Devgire

Bachhu Kadu Vs Girish Mahajan News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर जळगावला आक्रोश मोर्चा झाला. यावेळी कर्जमाफीच्या प्रश्नांवर शेतकरी आक्रमक होते. शेतकऱ्यांनी गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू मोर्चात सहभागी झाले.

केळी उत्पादकांचे प्रश्न आणि कर्जमाफी या विषयावर शिवसेनेच्या या मोर्चाला मोठा प्रतिसाद होता. माजी खासदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा झाला. यावेळी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरले.

जळगावचा केळी उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्याच्या या अडचणीत कोणीही आमदार, खासदार आणि मंत्री कोणीही धावून आले नाही. या संकटमोचक गिरीश महाजन यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांसाठी काय केले?, असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे स्वतःला संकटमोचक म्हणवून घेतात. मात्र ते शेतकऱ्यांचे संकटमोचक होऊ शकले नाही. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही करू शकले नाही. ते फक्त भाजपचे संकट मोचक आहेत, हे लक्षात ठेवा. ते पक्षासाठी आहेत शेतकऱ्यांसाठी नाही, अशी टीका माजी आमदार कडू यांनी केली.

शेतकरी खूप घाबरतो. सहनशील राहतो. त्यामुळेच हे सरकार आणि व्यवस्था तुमची दखल घ्यायला तयार नाही. आमदार, मंत्री तुम्हाला गृहीत धरतात. शेतकऱ्यांकडे पाठ फिरवून सत्ता भोगतात. ही स्थिती बदलावी लागेल.

गुन्हा दाखल होत असेल तर शेतकऱ्यांनी घाबरायचे कारण नाही. माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. चार गुन्ह्यात मला शिक्षा सुनावली आहे. गुन्हा दाखल झाल्याने काय होणार आहे? असा प्रश्न त्यांनी केला. दिव्यांग आणि शेतकरी यांच्यासाठी हजार गुन्हे दाखल झाले तरी घाबरू नको असे माझ्या आईने बजावले आहे.

आजचा समाज, शेतकरी आणि जनतेचे दुरावस्था पाहता संताप येतो. शेतकऱ्यांनी देखील ही सहनशीलता सोडली पाहिजे. नेपाळ सारखी स्थिती नसली, तरी मंत्र्यांच्या घरापर्यंत तर आपण जाऊ शकतो. जाब विचारू शकतो, त्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकार्यालयावर आक्रोश मोर्चा झाला. त्यात प्रहार संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले. केळी उत्पादकांच्या प्रश्नावर आक्रमक मोर्चा ने पोलिसांची ही धावपळ उडाली होती.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT