Maratha Reservation Issue: याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी छगन भुजबळ यांना सुनावले, चुकीची माहिती पसरवू नका.

Maratha reservation issue, Chhagan Bhujbal controversy, Vinod Patil questions to Bhujbal-मराठा समाज मागास आहेच, ते सरकारने स्विकारले, त्यावर छगन भुजबळ यांनी मंत्री म्हणून केलेले मतदान विसरले का?
Chhagan Bhujbal & Vinod Patil
Chhagan Bhujbal & Vinod PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर येथे मराठा आरक्षणाबाबत विरोधी भूमिका घेतली. मराठा समाजाला आरक्षण नको, असे सांगितले. त्यांच्या भूमिकेला अभ्यासक विनोद पाटील यांनी विरोध केला आहे.

नागपूर येथील ओबीसी परिषदेत छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षण देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा आरक्षणाबाबत याचीकाकर्ते विनोद पाटील यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मराठा समाज मागास आहे की नाही, यासंदर्भात विविध आयोग नेमले गेले. यातील शेवटच्या आयोगाने मराठा समाज मागास आहे, असा अहवाल दिला आहे. हा अहवाल राज्य शासनाने स्वीकारला. याचा विसर मंत्री असूनही छगन भुजबळ यांना कसा पडतो?

Chhagan Bhujbal & Vinod Patil
Simhasth Kumbh Mela politics: आधी ग्रुप टेंडर, आता थेट ‘इस्टिमेट’ दुप्पट करीत महापालिकेचा कोटींचा घोटाळा?

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शेवटच्या आयोगाने दिलेला अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला. त्यावर मतदान होऊन तो स्वीकारण्यात आला. त्यात मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी देखील मतदान केले.

Chhagan Bhujbal & Vinod Patil
Eknath Shinde MLA : आरक्षणाला विरोध केल्याने एकनाथ शिंदेंच्या आमदाराला शिवीगाळ, आदिवासी समाज आक्रमक

आयोगाने मराठा समाज मागास आहे, अशी स्पष्ट शिफारस केली आहे. त्यावर मंत्री भुजबळ यांनी अनुकूल मतदान केले. याचाच अर्थ त्यांनी मराठा समाज मागास असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सध्या मंत्री भुजबळ जी वक्तव्ये करीत आहेत, ती त्याला अनुसरून नाहीत.

हा इतिहास असताना मंत्री भुजबळ हे नागपूर येथे वेगळी भूमिका कशी काय मांडू शकता?. जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात माहिती कसे पसरवतात. राज्य सरकारचा घटक म्हणून असे करता येते का?. भुजबळ यांना आपणच केलेले मतदान मान्य नाही का? असा प्रश्न विनोद पाटील यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यामुळे खरोखर कोणाच्या आरक्षणाला धक्का लागलेला आहे का?. कोणाचे आरक्षण कमी होणार आहे का? प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. ही वस्तुस्थिती असताना सरकारचा भाग असलेल्या आणि मंत्री म्हणून भुजबळ यांनी या विषयावर असा प्रचार करणे योग्य नाही. हे तातडीने थांबवावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com