Bachchu Kadu 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bachchu Kadu On BJP Mahayuti : शेतकरी हिंदू नाहीत का? बच्चू कडू म्हणाले, ''एक हैं तो सेफ हैं'चा नारा देत भाजपनं...'

Bachchu Kadu Criticizes BJP Mahayuti in Ahilyanagar Rally During Farmers Loan Waiver Yatra : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णय घेत नसलेल्या भाजप महायुती सरकारवर अहिल्यानगरमधील सभेतून बच्चू कडू यांची जोरदार टिका केली.

Pradeep Pendhare

Bachchu Kadu Ahilyanagar speech : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची राज्यात संघर्ष यात्रा सुरू आहे. अहिल्यानगर मधील सारोळा कासार इथं सभा घेत, भाजप महायुतीवर जोरदार टिका केली.

'जाती-धर्मांत वाद लावण्याचे सर्वच राजकीय पक्षांचे षडयंत्र सुरू आहे. लोक जाती-धर्मांत भांडले की, सरकारला कोणी प्रश्न विचारत नाही. निवडणुकीत भाजपचा एक हैं तो सेफ हैंचा नारा होता. आता अतिवृष्टीत नुकसान झालेले शेतकरी हिंदू नाहीत का?' असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

शेतकरी (Farmer) कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांची राज्यभर संघर्ष यात्रा सुरू आहे. नगर तालुक्यातील सारोळा कासार इथं त्यांची सभा झाली. बच्चू कडू यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. यावेळी प्रहारचे राज्य उपाध्यक्ष बल्लू जंजाळ, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, तालुकाध्यक्ष शंकर बेरड आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, "पंजाबमधील शेतकऱ्यांना केंद्र व राज्यांनी मिळून प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये दिले. त्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना देखील देण्यात यावेत. परंतु त्यांची मानसिकता दिसत नाही. आपले शेतकरी हिंदू ना का? त्यांना का मदत केली जात नाही? जात, धर्म आणि राजकीय पक्षांत विभागल्यामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे आता तरी एक होवून सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडा."

कारखानदारांवर गुन्हे दाखल करा

'कारखान्याला ऊस घालून वर्ष झाले, तरी शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. राज्यात एक कारखाना धड राहिला नाही. एका बाजूला शेतकऱ्यांची मते घ्यायचे, दुसऱ्या बाजूला त्यांना लुटायचे, अशी कारखानदारांची भूमिका आहे. उशिरा पैसे देणाऱ्या कारखान्यांनी !5 टक्के व्याजाने पैसे द्यावेत; अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत,' अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

नैसर्गिक आपत्तीतून मदत करावी

बच्चू कडू यांनी, राज्य सरकारला ओला दुष्काळ जाहीर करता येत नसेल, तर नैसर्गिक आपत्तीसाठी केंद्र व राज्य सरकारचा वेगळा निधी असतो. त्यातून शेतकऱ्यांना मदत करावी. पुराच्या पाण्यात जमिनी खरडून गेलेल्या शेतीचा रोजगार हमी योजनेत समावेश करून त्यांच्या शेतात माती टाकून द्यावी, अशी मागणीही केली.

राज्यात 'चक्का जाम'

अधिकाऱ्यांच्या पगाराला, महामार्ग बांधायला सरकारकडे पैसे आहेत. परंतु, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की, पैसे नसल्याचे कारण दिले जाते. लाडक्या बहिणीकडे बोट दाखवले जाते. सरकारने कर्जमाफीवरुन बनवाबनवी थांबवून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा. सरकारने 27 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा; अन्यथा 28 ऑक्टोबरपासून राज्यात 'चक्का जाम' आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT