Manikrao Kokate, Bachchu Kadu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikarao Kokate Vs Bachchu Kadu : रात्रभर ताटकळले पण कृषिमंत्री भेटलेच नाही! बच्चू कडूंना माणिकराव कोकाटेंचा चकवा

Bachchu Kadu’s Protest Manikarao Kokate : आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी माजी राज्यमंत्री कडू यांना जाण्याची विनंती केली. मात्र कृषिमंत्री कोकाटे यांना भेटून चर्चा करायची आहे, असा आग्रह त्यांनी धरला.

Sampat Devgire

Bacchu Kadu News : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा मशाल मोर्चा चांगलाच गाजला. कृषिमंत्री घरासमोर मध्यरात्री हे आंदोलन होणार होते. आंदोलन झाले मात्र ते वेगळ्याच कारणाने गाजत आहे. कृषिमंत्र्यांना घेरण्यासाठी हे आंदोलन झाले मात्र शेवटपर्यंत कृषिमंत्री काही बच्चू कडूंना भेटलेच नाहीत.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील मशाल मोर्चासाठी रात्री नऊला कार्यकर्ते जमले आणि त्यानंतर वेगळ्याच घडामोडी घडल्या. कडू यांनी सुरुवातीला कृषिमंत्र्यांच्या विसे मळा येथील घराकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोकाटे तेथे राहत नाहीत, लक्षात आल्यावर त्यांनी कोकाटे यांच्या नयनतारा या निवासस्थानी मोर्चा नेला. कार्यकर्ते पेटविलेल्या मशालीसह येथे घोषणा देत होते.

आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी माजी राज्यमंत्री कडू यांना तेथून जाण्याची विनंती केली. मात्र कृषिमंत्री कोकाटे यांना भेटून चर्चा करायची आहे, असा आग्रह त्यांनी धरला. कृषिमंत्री कोकाटे घरी नाहीत त्यामुळे ते शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्या नंतरही कडू भेटण्यासाठी हट्टाला पेटले होते.

कृषिमंत्री कोकाटे सिन्नरला असल्याचे पोलिसांनी कडूंना सांगितले. नंतर ते मोर्चा संपवून कृषिमंत्री कोकाटे यांना भेटण्यासाठी सिन्नरला गेले. तेथून वेगळेच नाट्य सुरू झाले. कडू यांचे वाहन सिन्नरच्या घाटातच रोखण्यात आले. हे पोलिसांची बराच वेळ शाब्दिक वादविवाद सुरू होता.त्यानंतर कडू यांना सिन्नरच्या शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले.

यासगळ्यात तीन तासात कडू यांनी कोकाटे यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांनी कोकाटे हे सिन्नरमध्ये नाहीत हे स्पष्ट केले.कृषिमंत्री कोकाटे सिन्नरमध्ये नाहीत हे समजल्यानंतर देखील कडू मागे हटायला तयार नव्हते. त्यांनी कृषीमंत्र्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही, असे पोलिसांना ठणकावले. ते पहाटेपर्यंत शासकीय विश्रामगृहात थांबून होते मात्र त्यांना कृषिमंत्री काही भेटले नाहीत.

पोलिस, प्रशासन हैरा

बच्चू कडू यांची आंदोलने सातत्याने विविध कारणाने चर्चेत असतात. त्यात वाद देखील होतात. कृषी कर्जमाफीसाठी त्यांनी नाशिकमध्ये काढलेले मशाल मोर्चाचे आंदोलन देखील असेच गाजले. आंदोलन तर झाले मात्र कृषिमंत्री कोकाटे त्यांना अखेरपर्यंत भेटले नाही. बच्चू कडू यांनी जंग जंग पछाडले. पहाट पर्यंत इच्छा पुरवला मात्र साध्य काहीच झाले नाही. मात्र या सगळ्यात पोलिसांवर ताण आला. प्रशासन देखील हैराण झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT