Vishal Patil : सांगलीचं राजकारण फिरणार; खासदार पाटलांच्या 'विशाल' हृदयात काँग्रेस नव्हे तर शिवसेना? ही जवळीक तह की पार्टनरशीप?

Vishal Patil Politics : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विशाल पाटील यांची कोंडी केली होती. तो चक्रव्यूह भेदून विशाल खासदार झाले.
Vishal Patil
Vishal Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : अजित झळके

सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी ‘मी भविष्यात काँग्रेसमध्ये असेन किंवा अन्य कोणत्या तरी पक्षात’ असे म्हणत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांचा संभ्रम निर्माण करणे हा आवडीचा विषय बनला आहे. अशा चर्चांनामुळेच ते सतत चर्चेत राहतात. या वक्तव्यानंतर मात्र विशाल पाटील सत्तेसोबत जातील का? अशी चर्चा रंगू लागली आहे. तशी वेळ आली तर विशाल पाटील हे भाजपसोबत जातील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र खरी गोष्ट म्हणजे ते शिवसेनेसोबत राहणे पसंत करतील, असे जाणकारांचे निरीक्षण आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विशाल पाटील यांची कोंडी केली होती. तो चक्रव्यूह भेदून विशाल पाटील खासदार झाले. त्यासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. वसंतदादांचा नातू लक्षवेधी कामगिरी करत संसदेत पोहचला. त्यांनी काँग्रेसला पाठींबा दिला. ते सहयोगी सदस्य झाले.

काँग्रेसची सदस्य संख्या 99 होती. पण विशाल पाटलांमुळे ती शंभर झाली. त्यामुळे विशाल पाटील यांचे काँग्रेससोबत असण्याचे महत्व ‘शंभर नंबरी’ आहे. काँग्रेसनेही आतापर्यंत संसदेत विशाल पाटील यांचा सन्मान ठेवलेला दिसतोय. संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस सदस्यांचे अलिखित नेतृत्व विशालच करताहेत. भाजपदेखील त्यांना गोंजारत आहे. त्यांना मिळणारा वेळ पाहता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विशाल पाटील यांच्याबद्दलचा स्नेह अधिकच ‘लक्षवेधी’ दिसला आहे.

Vishal Patil
Vishal Patil : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; विशाल पाटलांना लागले मंत्रि‍पदाचे वेध; भाजप प्रवेशाबद्दल सूचक विधान

अशा या स्थितीत विशाल पाटील यांच्या एका विधानाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मंत्रीपदी संधी मिळाल्याचा दाखला दिलाय. विशाल पाटील यांनी ‘जयकुमार आधी अपक्ष आमदार झाले आणि आता मंत्री. मीही सध्या अपक्ष आहे. भविष्यात काँग्रेसमध्ये असेन किंवा अन्य पक्षात, मलाही मंत्रीपदी संधी मिळेल’, असे विधान त्यांनी केले.

आतापर्यंत ‘आयडॉलॉजी’वर जोर देणाऱ्या विशाल पाटील यांनी पहिल्यांदाच ‘अन्य पक्षात’, असा उल्लेख केला आहे. आता अन्य पक्ष म्हणजे कोणता? यावर चर्चा होणे सहाजिकच. राज्य व देशातील सध्याची परिस्थिती पाहता राजकीय पंडीत तातडीने भाजपशी संबंध जोडताना दिसतात.

Vishal Patil
Vishal Patil : कोण अधिक तरूण? खासदार विशाल पाटलांना 'या' आमदाराचा चिमटा, बैठकीत एकच हशा!

परंतू, विशाल पाटील यांच्या सध्याच्या हालचाली पाहता, भविष्यात त्यांनी काँग्रेस वगळता अन्य पक्ष निवडलाच तर तो भाजप नसेल, असे संकेत मिळत आहेत. त्यांच्याकडे अशा स्थितीत पर्याय उरतो तो फक्त शिंदे यांच्या शिवसेनेचा. अर्थात, ते या पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता सध्यातरी नाही. ते फक्त पाठिंबा बदलू शकतील किंवा आहे या स्थितीत शिंदेंच्या सेनेसोबत ‘तह’ करत राहतील.

तहातून हाती काय?

विशाल पाटील यांना नियमाने वार्षिक खासदार निधी मिळणारच आहे. शिवाय जिल्हा नियोजन समिती निधीत त्यांचा निश्चित वाटा आहेच. मात्र त्या जोरावर प्रभावी विकास शक्य नाही. त्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अतिरिक्त लाभ पदरात पाडून घ्यावा लागतो. तो महत्वाचा असतो. यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून केंद्रातून आणि राज्यातूनदेखील हा लाभ विशाल यांना मिळू शकतो.

यामुळे ते शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांच्या विरोधात बोलणं टाळतात. ते भाजपवर टीका करतील, मात्र शिवसेनेला डिवचत नाहीत. ही ‘पार्टनरशीप’ कसा रंग आणते, यावर विशाल यांची भविष्यातील दिशा ठरेल. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही विशाल पाटलांचे मैत्रीचे संबंध असून आता याचे नवे पर्व लोकसभेत दिसून आलेले आहेत.

भाजप का नाही?

विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. या घराण्यासोबत मुस्लिम आणि दलीत समाजाने नेहमीच भक्कम साथ उभी केली आहे. परिणामी, हा मतदार या घराण्याचा हक्काचा माणला जातो. विशाल पाटील यांनी भाजपची निवड केली तर हा मतदार त्यांच्यासोहब जाण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी शिवसेना निवडली तर त्यातील काही टक्के मतदार व्यक्तीसापेक्ष विचार करू शकतो. विशाल पाटील यांना त्याची पक्की जाणीव आहे.

Vishal Patil
Vishal Patil BJP Offer : चंद्रकांतदादांच्या भाजप प्रवेशाच्या गुगलीवर विशाल पाटलांचा सिक्सर; म्हणाले, "मी आता कायद्यानेच..."

शिवसेनेला फायदा काय?

विशाल पाटील यांची बेरीज किंवा वजाबाकीच्या शिंदेंच्या शिवसेनेला आजघडीला फायदा-तोटा नसला तरी ते लांब पल्ल्याचा विचार करू शकतात. भविष्यात काही निर्णयांमध्ये नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायकी यांची साथ मिळाली नाही तर अपक्ष व अन्य छोट्या घटकांचा टेकू लागू शकतो. त्यासाठीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com