Balasaheb-Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Politics: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा विरोधकांना घरचा आहेर... म्हणाले, सर्व काही गोड गोड सुरू आहे!

Badasaheb Thorat; opposition should be tough on the issue of farmer loan waiver both in the House and outside it-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांना सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आक्रमक व्हावेच लागेल

Sampat Devgire

Balasaheb Thorat News: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सध्याच्या महायुती सरकारचे धोरण आणि विरोधी पक्षांची भूमिका यावर कोरडे ओढले आहे. राज्यात सध्या सर्वकाही गोड गोड सुरू आहे. या शब्दात त्यांनी विरोधकांना घरचा आहेर दिला आहे. यानिमित्ताने शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

संगमनेर येथील जयहिंद लोकचळवळ आणि कृषी विभागाच्या वतीने वसंतराव नाईक स्मृतिदिनानिमित्त झालेल्या शेतकरी सन्मान कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री थोरात यांनी विरोधकांना घरचा आहेर दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत लागतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सत्ताधारी पक्षाकडून ठोस भूमिका घेण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे हा विरोधकांसाठी आंदोलनाचा विषय ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री थोरात यांनी राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले. शेतकरी हा आपला धर्म आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. शेतकऱ्याला आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकारला भूमिका घ्यावीच लागेल. त्याशिवाय शेती क्षेत्रात बदल आणि सुधारणा होऊ शकणार नाही.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते हे विसरता येणार नाही. विरोधी पक्षात असल्याने मी तर या विषयावर सतत बोलतच राहणार आहे. मात्र विरोधी पक्षांची ही मोठी जबाबदारी आहे. या विषयावर सभागृहात आणि सभागृह बाहेर आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात गोंधळाचे आणि वादाचे विषय रोज घडत आहेत. मध्ये नेमकेपणाने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत नाही, असे संकेत मिळत आहेत. यावरच काँग्रेसने ते थोरात यांनी बोट ठेवले आहे. त्यामुळे हा विरोधी पक्षांनाही घरचा आहेर मानला जातो.

यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार सत्यजित तांबे आणि माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांसह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित संस्थांना यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT