Chhagan Bhujbal Politics: राज, उद्धव ठाकरे एकत्र आले, मात्र... छगन भुजबळ यांची सावध प्रतिक्रीया...व्ययक्त केली ही शंका!

Chhagan Bhujbal; Raj and Uddhav Thackeray came together is but natural- मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणे स्वाभाविक
Uddhav Thackrey, Chhagan Bhujbal & Raj Thackeray
Uddhav Thackrey, Chhagan Bhujbal & Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणात ही मोठी घटना मानली जाते. त्याचा राज्याच्या आगामी राजकारणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या प्रत्येकासाठी हा चर्चेचा विषय़ आहे.

यासंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामागे मराठी भाषेचा विषय हे तात्कालीक कारण आहे. मात्र यामध्ये अनेकांना काही शंका देखील आहेत.

राज ठाकरे शिवसेनेतून वेगळे झाले. ते का वेगळे झाले? आणि ते कारण किंवा त्यातील समस्येचे निराकरण झाले का? हा खरा प्रश्न आहे. त्याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरीही, आगामी राजकीय स्थितीचे काय? हे स्पष्ट झाले पाहिजे, असे श्री. भुजबळ म्हणाले.

Uddhav Thackrey, Chhagan Bhujbal & Raj Thackeray
Ajit Pawar Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणता विक्रम केला माहिती आहे का?, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनीही सांगितले.

राज ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना म्हटले की. जे कोणालाही शक्य झाले नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्य झाले. त्यांच्यामुळेच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असे विधान केले होते. त्यावर देखील छगन भुजबळ यांनी आपले मत सांगितले.

ठाकरे बंधू एकत्र येण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा संबंधच काय आहे? राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, त्या कारणावर ठाकरे बंधूंमध्ये आजही चर्चा झाली आहे काय?. त्याचा खुलासा झालेला नाही. त्यामुळे लगेचच याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करणे थोडेसे घाईचे होऊ शकेल.

ठाकरे बंधू एकत्र आले किंवा ठाकरे कुटुंब एका व्यासपीठावर येत असेल तर त्याचे कोणालाही वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. राज्यातील अनेकांना त्यांनी एकत्र यावे अशी इच्छा होती. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ते एकत्र आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांसाठी केली होती.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com