Bhaskarrao Bhagare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Women`s health Racket: बदलापूर गर्भाशयाचा बाजार; प्रकरण पोहेचले केंद्राच्या कोर्टात, भास्कर भगरे यांनी केली `ही` मागणी!

Badlapur-Nashik-Womens-health-racket-Crime-NCP-MP-Bhaskarrao-Bhagare-Raised-Issue-बदलापूर स्त्री बीजाणू रॅकेट प्रकरणाला गंभीर वळण, भास्कर भगरे यांनी केली केंद्राला हस्तक्षेपाची मागणी

Sampat Devgire

Bhaskarrao Bhagare News: बदलापूर येथील रुग्णालयातून महिलांची झालेली फसवणूक प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. महिला गर्भाशयाचा हा बाजार व त्यातील वैद्यकीय तज्ञांचा सहभाग यातून धक्कादायक प्रकार पुढे आले आहे. यासंदर्भात महिला डॉक्टरच्या पतीला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

बदलापूर येथील गरीब महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांचे वैद्यकीय शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार सबंध राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातील स्त्रीबीजांची परदेशात बेकायदा विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेतली आहे.

यासंदर्भात विधींडळात प्रश्न उपस्थित झाला. त्यावर चर्चा झाली. त्यातील मानवी समाजाला काळीमा ठरलेल्या .या प्रकरणाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यात आले. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत प्रसंगी मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे सुतोवाच केले होते.

यासंदर्भात खासदार भास्करराव भगरे यांनी केंद्रीय संस्थांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात महिलांच्या असहाय्यतेचा व आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेण्यात आला. हे प्रकरण गंभीर आहे, देशात अन्यत्र या घटना घडू शकतात, अशी भिती व्यक्त केली.

ग्रामीण भागात महिलांच्या ‘ स्त्री बीजाणू काढण्याच्या’ कथित रॅकेटची तात्काळ चौकशी करण्याची गरज आहे.   महिलांच्या स्त्री बीजाणू काढून घेण्याच्या कथित बेकायदेशीर रॅकेटबाबत खासदार भगरे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार भगरे यांनी केली.

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व आदिवासी महिलांना प्रलोभने देऊन त्यांच्याकडून  स्त्री बीजाणू घेण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारच्या प्रक्रियेमुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात तसेच हा प्रकार वैद्यकीय नैतिकतेच्या व कायद्याच्या चौकटीच्या विरोधात असल्याची शक्यता आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रसाद नड्डा यांना पत्र लिहीले आहे. या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. देशातील सर्व आय.व्ही.एफ. आणि फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये सुरू असलेल्या प्रक्रियांची तपासणी व्हावी. कायद्याचे पालन होत आहे का? याची खात्री करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासदार भगरे यांनी पुढे सांगितले की, महिलांच्या आरोग्याशी व सन्मानाशी संबंधित असा गंभीर विषय असल्याने याकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. त्यांनी या संदर्भात देशात इतर ठिकाणीही असे प्रकार घडत आहेत का याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT