Onion Farmers Issue: कांदा प्रश्न पुन्हा पेटला; मंत्री भुजबळांच्या मतदारसंघात काँग्रेस झाली आक्रमक!

Yeola Chhagan Bhujbal Onion Producer Farmers' Protest Congress Serial-कांदा दर गडगडल्याने शेतकरी झाले उध्वस्त; आक्रमक काँग्रेसने दिला सरकारला गंभीर इशारा
Chhagan-Bhujbal
Chhagan-BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Congress News: केंद्र सरकारने कांदा प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याचे पुन्हा एकदा टाळले. निर्यात सुविधा कमी केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. हा निर्णय स्थगित केल्यावरही बाजारातील स्थिती अधिक बिकट झाली आहे. 

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी पाचशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली. या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

मंत्री भुजबळ यांच्या मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी हा प्रश्न हाती घेतला आहे. उत्पादकांच्या प्रश्नावर भुजबळांच्या मतदारसंघात काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र आहे. 

Chhagan-Bhujbal
Women's Day : महिला दिनानिमित्त मोठी दिलासादायक बातमी! अंनिस अन् नीलम गोऱ्हेंच्या हस्तक्षेपानं हजारो महिलांची 'ती' गैरसोय झाली दूर

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन बळीराम शिंदे सुखदेव मढवई आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी काल तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले. टिंमक्या वाचवत केलेल्या या आंदोलनात केंद्र शासनावर टीका करण्यात आली. 

Chhagan-Bhujbal
Nashik Police Recruitment : टोमण्यांवर मात करत खाकीकडे झेप, नाशिकमध्ये पोलिस भरतीच्या मैदानात तृतीयपंथीयाची दमदार कामगिरी

छगन भुजबळ राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. मात्र हे डबल इंजिन सरकार कांदा प्रश्नावर उदासीन आहे. शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला भाजपचे सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली. 

मंत्री भुजबळ यांनी राज्य सरकारकडे कांद्याला पाचशे रुपये अनुदान देण्याचे मागणी केली होती. खासदार भास्कर भगरे आणि राजाभाऊ वाजे यांसह काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी केंद्रीय सचिवांकडे हा मुद्दा मांडला. आता काँग्रेसने थेट भुजबळ यांच्या मतदारसंघातच आंदोलन सुरू केले आहे. 

सध्या कांद्याचे दर आठवड्याभरात चारशे रुपयांनी खाली आले. कांदा उत्पादक उध्वस्त झाला. काँग्रेस पक्ष याबाबत एक पाऊल पुढे जात किमान दीड हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व चौदा आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाच्या या लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांचा हा प्रश्न उपेक्षित राहिला आहे. विधिमंडळातही सत्ताधारी पक्ष फारसा आक्रमक नसल्याने आता थेट मंत्री भुजबळ यांच्या मतदारसंघातच काँग्रेस पक्षाला आंदोलन करण्याची आयतीच राजकीय संधी मिळाल्याने तो चर्चेचा विषय आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com