Ravi Rana Vs Jayashree Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ravi Rana Vs Jayashree Thorat : रवी राणांचे वक्तव्य म्हणजे, महाराष्ट्रातील महिलांच्या स्वाभिमानावर घाव; जयश्री थोरात, दुर्गा तांबे संतापल्या

Ravi Rana Controversial Statement : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पैशाबाबत केलेल्या वक्तव्याचा संगमेनरमध्ये निषेध करण्यात आला. बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री आणि बहीण दुर्गा तांबे निषेधासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जनतेकडे मतांच्या रुपात आशीर्वाद माघताना वादग्रस्त वक्तव्य केले. निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला, तर या दीड हजार रुपयांचे तीन हजार रुपये होतील. पण जर हे आशीर्वाद दिली नाही, तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे दीड हजार रुपये परत घेईल, असे वक्तव्य केले.

या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटले असून रवी राणा यांचा निषेध नोंदवण्यासाठी संगमनेरमध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री आणि बहीण दुर्गा तांबे रस्त्यावर उतरल्या होत्या.

"महाराष्ट्राने कायमच महिलांचा सत्कार करत आला आहे आणि पुढे देखील करत राहील. महायुती सरकारने मते खरेदीसाठी महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत. सरकारच्या घोषणासाठी लागणारा पैसा हा जनतेचाच आहे. महायुतीचा नाही. आमदार रवी राणांसह (Ravi Rana) महायुती सरकारने महिलांची माफी मागावी. सत्ताधारी आमदार रवी राणा यांचे बेताल वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही", अशा इशारा नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिला.

महाराष्ट्राला थोर समाजसुधारक आणि संतांची परंपरा लाभली आहे. महिलांचा सन्मान होणाऱ्या या महाराष्ट्रात महायुतीकडून महिलांचा अपमानाचे धोरण अंवलंबले आहे. पैसे परत घेण्याची बेताल वक्तव्य सत्ताधारी आमदार मंत्र्यांच्या उपस्थित करतो आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यांच्या मनातील आता ओठावर येऊ लागल्याचा टोला दुर्गा तांबे यांनी लगावला.

मते खरेदीचा प्रकार निंदनीय

युवक काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा जयश्री थोरात यांनी रवी राणा यांची चांगलीच खरडपट्टी काढली. निवडणुका जवळ आल्याने महायुती सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्यात. रवी राणांसह इतर आमदारही मते न दिल्यास पैसे परत घेऊ, अशी बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत. लोकशाहीमध्ये उघड उघड मते खरेदीचा हा प्रकार आहे आणि तो अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला भगिनींचा अपमान झाला असून या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो, असे जयश्री थोरात यांनी म्हटले.

घोषणाबाजीत विकास कामे थांबवली

मिलिंद कानवडे यांनी घटनाबाह्य महायुतीचे सरकार लोकप्रियता कमी होत आहे, म्हणून ती योजनांची घोषणाबाजी करत सुटले आहेत. विकास कामे थांबून घोषणांबाजीवर भर दिला आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला याची भुरळ पडणार नाही, असे म्हटले. संगमनेर बसस्थानक येथे काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने रवी राणा यांचा निषेध करण्यात आला. नगराध्यक्ष दुर्गा तांबे , मिलिंद कानवडे, जयश्री थोरात, गौरव डोंगरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रवी राणा यांनी सर्व महिला भगिनींची माफी मागणी, अशी मागमी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT