Shankarrao Gadakh Vs Shiv Sena : आमदार गडाखांविरोधात शिवसेनेने ठोकला शड्डू; नेवाशात धनुष्यबाणच चालणार...

Shiv Sena will fight against Shankarrao Gadakh : नेवासा विधानसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराविरोधात शड्डू ठोकला आहे. शिवसेनेचाच उमेदवार इथं निवडून आणायचा, असा निर्धार यावेळी केला.
Shankarrao Gadakh Vs Shiv Sena
Shankarrao Gadakh Vs Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांना विधानसभा निवडणुकीला आव्हान मिळाले आहे. धनुष्यबाण चिन्हं असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाने नेवासा विधानसभा मतदारसंघातील आमदार गडाखांविरोधात शड्डू ठोकला आहे.

नेवासा मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढवले. यासाठी शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार गडाखांविरोधात सूर आवळत निवडणुकीच्या कामाला लागल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीला नेवासा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (Shiv Sena) उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी लीड होता. हे मताधिक्य नेवाशात शिवसेनेची ताकद सांगतो. त्यामुळे या विधानसभेला शिवसेनेला, धनुष्यबाण चिन्हाला इथं संधी आहे. त्यामुळे नेवासा मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार उभा राहिला पाहिजे. धनुष्यबाण हे चिन्हं घराघरापर्यंत पोचले आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकसाथ ताकद लावल्यास शिवसेनेचा उमेदवार नेवासा मतदारसंघातून निवडून येईल.

Shankarrao Gadakh Vs Shiv Sena
Rohit Pawar : आमदार पवारांच्या मतदारसंघात चाललंय काय? 'सुपारी', 'लाकडी बाज' अन् पुढील अपडेट 16 ऑगस्टला...

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार आणि जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यात राबवलेल्या योजना नेवाशातील घराघरापर्यंत पोचताना उमेदवाराचा प्रचार करणार असल्याची ग्वाही दिली. जिल्हा प्रमुख नितीन औताडे यांनी देखील शिवसेनाच हीच जागा लढवणार असल्याचे सांगितले.

Shankarrao Gadakh Vs Shiv Sena
Monica Rajale Vs Chandrashekhar Ghule : 10 वर्ष घराबाहेर नसलेल्यांना गावं ओळखू येईना; आमदार राजळेंनी घुलेंवर साधला निशाणा

माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, "नेवाशा मतदारसंघ हा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. येथे सम्राटांची दहशत आहे. ही दहशत मोडून काढण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार इथं निवडून आला पाहिजे. शिवसेना साखरपट्ट्यात परिवर्तन घडवून आणू शकते". मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरिबांनासाठी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत घेऊन जा, असे आवाहन सदाशिव लोखंडे यांनी केले.

शिवसेनेचे विधानसभा निरीक्षक डेव्हीड जेरी यांनी नेवासा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा स्थापन करा. कार्यकर्त्यांचे जाळे उभे करा. त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा काम मी करेल. या विधानसभा निवडणुकीला शिवसेना ठाकरे पक्षाच्या विरोधात इथं शिवसेनेचा उमेदवार लढा देईल, असेही त्यांनी सांगितले. सुरेश शेटे, भाऊसाहेब वाघ, के. एच. वाखुरे, रविराज गडाख, शुभम उगले यांच्यासह कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com