Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांनी पुढची राजकीय दिशा ठरवली; म्हणाले, 'मी काँग्रेसचा...'

Balasaheb Thorat Sangamner Ahilyanagar district political trend Congress party : काँग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढची राजकीय वाटचाल कशी असेल, याची स्पष्ट संकेत दिले आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढची राजकीय दिशा काय, असेल यावर स्पष्ट भाष्य केले आहे.

"मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे. सध्या प्रदेश कमिटीत काम करत आहे. पक्षात प्रदेश पातळीवर काही बदल असतील, तर त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो काय किंवा सामान्य कार्यकर्ता असलो, तरी पक्षासाठी काम करत आलो आहे. पुढेही काँग्रेसचेच काम करत राहील", असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

भाजप (BJP) नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी संगमनेरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनाचं नेतृत्व केले. आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी थोरात यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर टीका केली.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "देशात आणि राज्यात घडणाऱ्या घटना काळजी वाढवणाऱ्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रपुरुषांची अवहेलना केली जात आहे. परभणीच्या आंदोलनात एका गरीबाचा जीव जातो, तर बीडमध्ये सरपंचाचीच हत्या होते. देशाच्या सर्वोच्च सभागृहात गृहमंत्री राष्ट्रपुरुषांची अवहेलना करतात. राष्ट्रपुरुष केवळ सत्ता मिळवण्यासाठी, असा भाजप सत्ताधाऱ्यांचा समज आहे". राज्यातील कायदा-सुव्यवस्था म्हणजे, बिहार पेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.

परभणी अशा घटना घडतातच कशा? सरकारचा नेमका हेतू काय? काल मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील भाषण ऐकले. सत्ताधारी हे प्रकरण दाबतील की काय? अशी शंका आता निर्माण होत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

भाजपचा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

भाजप केंद्रीय अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाची दिशा बदलण्याचा भाजप आता प्रयत्न करत आहेत. यातून त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालय फोडलं. त्यातील हा एक भाग होता. दुसरा म्हणजे, संसदेच्या प्रवेशद्वारावर धुडगूस घालणं हा होता. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे घणाघात बाळासाहेब थोरात यांनी केला.

राहुल गांधी रोखण्यासाठी सर्वकाही...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत भूमिका मांडली. परंतु त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता भाजप सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. यातून राहुल गांधी यांच्यावर गुन्हे दाखल केले. यातील वस्तुस्थिती पाहिल्यास सत्ताधारी भाजपच्या लोकांनीच राहुल गांधी यांचा रस्ता रोखून धरला. धक्काबुक्की केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला सुद्धा धक्काबुक्की केली. हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

महायुतीत अजूनही बराच गोंधळ

पुढील पाच वर्ष हे सरकार एकत्रित काम करेल, असं वाटत नाही. महायुतीतील अनेक मतभेद आजच चव्हाट्यावर आले आहेत. माणसं वापरायची आणि सोडून द्यायची ही भाजपाची पद्धत आहे. लोकांनी या अनुभवातून काहीतरी शिकलं पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT