Dr Hemlata Patil & Vasant Gite Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics: शिवसेना ठाकरेंच्या अडचणी संपेनात; काँग्रेसच्या डॉ हेमलता पाटील अपक्ष उमेदवारीवर ठाम!

Balasaheb Thorat; Congress leader Dr Hemlata Patil announce independent candidature-महाविकास आघाडीतील काँग्रेसला नाशिक शहरात एकही मतदार संघ न मिळाल्याने पक्षाचे पदाधिकारी नाराज.

Sampat Devgire

Congress News: नाशिक मध्य मतदारसंघ आणि येथील उमेदवारी वादाचा विषय ठरला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने माजी महापौर वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी महापौर गीते यांचा प्रचार देखील सुरू झाला आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिक मध्य मतदार संघासाठी काँग्रेस पक्ष प्रचंड आग्रही होता. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी शेवटपर्यंत ताणून धरले. मात्र शिवसेनेच्या आक्रमकतेपुढे त्यांचे फारसे काही चालले नाही.

नाशिक मध्य मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला सोडण्यात आला आहे. माजी महापौर वसंत गीते यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या मतदारसंघाचे जागावाटप स्थानिक काँग्रेस नेत्यांना मान्य झालेले नाही.

यावरून सुरू झालेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. परिणामी महाविकास आघाडीत बंडाचे वारे वाहू लागले आहेत. त्यात आता पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील जागावाटपाचा वाद उफाळला आहे.

यासंदर्भात आज काँग्रेस नेत्या डॉ हेमलता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. आम्ही शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म ची अपेक्षा करू. पक्षाने एबी फॉर्म न दिल्यास अपक्ष उमेदवारी करण्यात येईल.

त्याबाबतचा आपला निर्णय निश्चित आहे, असे डॉ. पाटील यांनी घोषित केले. काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी शहरात समर्थकांचा मेळावा घेऊन मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी केली होती.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे चिन्ह नाशिक शहरांमध्ये घरोघरी पोहोचले पाहिजे. त्यासाठी पक्षाला चार पैकी किमान एक तरी मतदारसंघ मिळायला पाहिजे. नाशिक मध्य मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ आहे.

त्यामुळे पक्षाने हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडून परत घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. एकंदरच काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीत बंडाची चिन्हे आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी महापौर गीते यांनी या नाराज उमेदवारांशी संपर्क करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

सोमवारी माजी महापौर गीते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नाराजी इच्छुकांची मनधरणी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, यालाही महत्त्व आहे. आता हे बंड खरोखर किती टिकते, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT