Devendra Fadnavis, Balasaheb Thorat  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress vs Bjp : "...म्हणून भाजपवर राम... राम... करण्याची वेळ"; फडणवीसांना थोरातांचा टोला

Pradeep Pendhare

Ahmednagar Politics : देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये भाजपने इतर राज्यांतील यंत्रणादेखील मैदानात उतरवली आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजप नेते प्रचाराची राळ उडवत आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचाराच्या मैदानात असून, त्यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत काँग्रेसवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर आणि इंदूरमध्ये केलेल्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर आणि इंदूरमध्ये भाजपच्या प्रचारासाठी सभा घेतली. फडणवीस यांनी काँग्रेसवर तिखट शब्दांत टीका केली. काँग्रेसचा राम मंदिरालाच नाही, तर रामालाही विरोध आहे. केवळ हिंदुत्वाला विरोध नाही, तर हिंदू या शब्दालाही विरोध आहे, अशी टीका फडणवीसांनी केली होती. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता का गरजेची आहे, हे सांगताना भाजप सत्तेवर आल्यावर तापी पुनर्भरण योजना वेगाने राबवली जाईल. याचा दोन्ही राज्यांना फायदा हेईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बुऱ्हाणपूर आणि इंदूरमधील मतदासंघात तीन सभा घेतल्या. छत्तीसगड, राज्यस्थानमध्ये दिलेली कोणती आश्वासनं पूर्ण केली, हे काँग्रेस नेत्यांनी दाखवून द्यावे. सत्तेवर आल्यावर जनतेला दिलेली वचने विसरायची आणि स्वतःचाच परिवार आठवायचा, ही काँग्रेसची नीती आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. या वेळी खासदार ज्ञानेश्वर पाटील, भाजप उमेदवार अर्चना चिटणीस, गोलू शुक्ला, खासदार उन्मेश पाटील, महापौर माधुरी पटेल उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केलेल्या या टीकेला पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. थोरात यांनी म्हटले की, "भाजपला राम कळलाच नाही. राम सर्वांचाच आहे. भाजप रामची वाटणी करत आहे. नेहमीच धर्माचा आधार घेत भाजप निवडणुकांना समोरे गेला आहे. जनतेची दिशाभूल केली आहे. आता मात्र जनता फसणार नाही. जनताच भाजपला प्रश्न विचारू लागली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर राम... राम... करण्याची वेळ आली आहे". भाजपकडे हिंमत नाही. असेल, तर रोजगार, महागाई, बेरोजगारी, वित्तीय मुद्द्यांवर निवडणुकांना सामोरे जावे, असेही आव्हान बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT