Pawar vs Shinde : आमदार शिंदेंच्या खेळीने रोहित पवारांना झटका; जवळ्यातील युवा नेत्याने सोडली साथ

Ram Shinde vs Rohit Pawar Karjat Jamkhed News : कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात शहकाटशहाचं राजकारण सुरू आहे....
Ram shinde, Rohit Pawar
Ram shinde, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics : भाजप नेते माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे हे जामखेड-कर्जत मतदारसंघावर दिवसेंदिवस पकड मजबूत करत चालले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार शिंदे यांच्या गटाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या गटाला पिछाडीवर टाकत यश मिळवले. यात लक्षवेधी ग्रामपंचायत ठरली होती, ती जवळा! येथील युवा नेते प्रशांत शिंदे यांनी राजकीय गट-तट बाजूला ठेवून निवडणूक लढवत जवळा ग्रामपंचायतीवर विजयध्वज फडकवला. मात्र, आमदार शिंदे यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रशांत शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत आमदार रोहित पवार यांना धक्का दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram shinde, Rohit Pawar
Nagar News : शिक्षक आमदारकी; नाशिककडून चाचपणी, तर नगरच्या नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात

युवा नेते प्रशांत शिंदे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत आमदार राम शिंदे यांच्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत शिंदे यांच्याबरोबर शेकडो तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याचबरोबर जवळा ग्रामपंचायतीवर भाजपच्या गटाचा कब्जा झाल्याचे अधोरेखित झाले आहे. प्रशांत शिंदे यांच्यासमवेत जवळा गावचे नवनिर्वाचित सरपंच सुशील आव्हाड, सदस्य शीतल शिंदे, सोनाली पाटील, रफिक शेख, राधिका हजारे, भाऊसाहेब महारनवर, मंगल आव्हाड, नंदा आव्हाड, हरिदास हजारे, सारिका रोडे, जयश्री कोल्हे या सर्वांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी आमदार शिंदे यांनी स्वागत करत निवडणुकीतील यशाबद्दल सदस्यांचा सत्कार केला.

अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, डॉ. गणेश जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक खेडकर, सोमनाथ पाचरणे, डॉ. सुनील गावडे, एकनाथ हजारे, अनंता लेकुरवाळे, राहुल मासोळे, अनिल माने उपस्थित होते.

प्रशांत शिंदे म्हणाले, जवळा ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नव्हता. निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली आणि जिंकली. आता गावाच्या विकासासाठी भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत आहोत. हा निर्णय सर्वांनी एकमुखी घेतला आहे. आमदार शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करत गावचा विकास हाच भाजपचा संकल्प आहे. जवळा ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या स्वागतालाच 25 लाख रुपयांचा निधी देऊन सन्मान केला आहे. यापुढेही गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

Ram shinde, Rohit Pawar
Balasaheb Thorat On BJP: भाजपची अस्वस्थता आणखी वाढणार ? बाळासाहेब थोरातांनी केला मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com