Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Politics: बाळासाहेब थोरात यांचा घणाघात, कांदा भ्रष्टाचाराचे पैसे परराज्यातील कोणत्या नेत्यांच्या खिशात गेले?

Balasaheb Thorat; Instead of giving justice to farmers, NAFED is committing corruption in onion procurement -नाफेड आणि केंद्रीय संस्थांनी केलेल्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची होते आहे लूट

Sampat Devgire

Nashik Onion Politics: कांदा निर्यात बंदी आणि त्यामुळे घसरलेले दर या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाफेडच्या कार्यालयावर मोर्चा काढला. नाफेडच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. केंद्रातील सरकार शेतकऱ्यांचा छळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज कांदा प्रश्नावर नाशिकला मोर्चा काढण्यात आला. नाफेड आणि केंद्रीय संस्था मिळून कांदा खरेदीत भ्रष्टाचार करीत आहेत. या संस्थांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पैसा कोण पळवत आहे, याचा तपास लागला पाहिजे. नाफेड ही संस्था कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळावा म्हणून स्थापन केली होती. आज मात्र ही संस्था भ्रष्टाचारात बुडाली आहे. अवसायानात गेलेल्या संस्थांना नाफेड कांदा खरेदीची परवानगी कशी देते? हा गंभीर प्रश्न आहे. यामध्ये परराज्यातील कोण, कोण नेते सहभागी आहेत याचा छडा लागला पाहिजे, असे माजी मंत्री थोरात म्हणाले.

प्रदेश नेते विश्वास उटगी, खासदार डॉ. शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, शिरीष कोतवाल, शहराध्यक्ष आकाश छाजेड, शरद आहेर, स्वाती जाधव, अल्तमष शेख, स्वप्नील पाटील आदींसह अनेक पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. यावेळी श्री. थोरात यांनी नाफेड संस्थेची चौकशी झाल्याशिवाय हे प्रकरण आणि कांदा उत्पादकांची झालेली लूट उघड होणार नाही, असे सांगितले.

नाफेडचे अध्यक्ष नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी स्वतःच भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले होते. जिल्हा उपनिबंधकांनी देखील या संदर्भात एक अहवाल सरकारला सादर केला होता. एवढे सगळे पुरावे असताना कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी का केली जात नाही?. त्यामध्ये सरकार गुन्हेगारांना संरक्षण का देते असा प्रश्न त्यांनी केला.

आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर पावसात नाफेडच्या कार्यालयावर कांदा खरेदीतील गैर व्यवहाराबाबत मोर्चा काढला. त्या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाऊस काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना नवा नाही. पावसाची चिंता आम्ही करीत नाही, असे यावेळी श्री थोरात यांनी सांगितले.

केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. येण्याआधी उत्पन्न दुप्पट करून अशी घोषणा केली होती. घोषणाचे काय झाले? हे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न अर्ध्यावर आणून ठेवले आहे. निषेध करण्यासाठी हे आंदोलन होत आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT