Balasaheb Thorat Sujay Vikhe sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat On Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांनी स्पष्टचं सांगितलं, सुजय विखे माजी खासदार होणार!

Pradeep Pendhare

Ahmednagar News : काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे माजी खासदार होणार असल्याचे राजकीय भाकीत वर्तवलं आहे. नगर दक्षिणमधून माजी आमदार नीलेश लंके दीड लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची महाविकास आघाडीत महत्त्वाची भूमिका राहिली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभांचा धुरळा उडवला होता.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर बाळासाहेब थोरात तिरुवनंतपुरमध्ये पद्मनाथम मंदिरात होते. तिथे त्यांच्याशी मराठी माणसांनी संवाद साधून देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली. यानंतर त्यांनी तेथून देशात आणि राज्यात काँग्रेसचे (Congress) सरकार येणार असल्याचे भाकीत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार खासदार डाॅ. सुजय विखे आता, माजी खासदार होतील, असे सांगून माजी आमदार नीलेश लंके दीड लाख मतदानाने निवडून येतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय राज्यात महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडणूक येतील, असाही राजकीय अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार सजंय राऊत, आमदार रोहित पवार यांच्याबरोबर सभा घेतल्या होत्या. थोरात यांनी या सभांमधून विखे यांच्या राजकारणावर प्रहार केले होते. यातून नगर जिल्ह्यात पुन्हा विखे-थोरात वाद रंगला होता. थोरात यांनी पूर्ण तयारी असल्याचे सांगून विखे यांना आव्हान दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT