Congress leader Balasaheb Thorat addressing media, accusing the Mahayuti government of corruption in onion purchase and disrespect towards senior minister Chhagan Bhujbal. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : महायुतीत ज्येष्ठ मंत्र्यांची अवहेलना, भुजबळ नाशिकचे मंत्री अन् झेंडावंदन महाजनांकडे, अद्याप सरकारी निवासस्थानही नाही

Chhagan Bhujbal Disrespect : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काल राज्य शासनावर कांदा खरेदीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी महायुती सरकार कोणाचाच मानसन्मान ठेवत नाही. त्यांनी जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचीही अवहेलना केल्याचा आरोप केला.

Sampat Devgire

Nashik News, 14 Aug : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काल राज्य शासनावर कांदा खरेदीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी महायुती सरकार कोणाचाच मानसन्मान ठेवत नाही. त्यांनी जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचीही अवहेलना केल्याचा आरोप केला.

छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत. मात्र महायुती सरकार सातत्याने त्यांची अवहेलना करीत आले आहे. मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतरही गेले कित्येक महिने त्यांना शासकीय निवासस्थान मिळालेले नाही. राज्य सरकार एका ज्येष्ठ मंत्र्याची अशी अवहेलना करते, हे योग्य नाही, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांनी भंडारा येथे स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यास जाण्यास नकार दिला होता. त्यानंतरही शासनाने त्याची दखल घेतली नाही. भुजबळांनी याबाबत स्पष्ट नकार कळवल्यावर मंगल प्रभात लोढा यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.

येत्या स्वातंत्र्य दिनाला नाशिक मध्ये देखील बाहेरच्या जिल्ह्यातील गिरीश महाजन झेंडा वंदन करणार आहेत. वस्तूता छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांना सन्मान मिळायला हवा. तसे होताना दिसत नाही.

आमच्याकडे असताना या नेत्यांना सन्मान होता. आता यातील अनेक नेत्यांना पाचव्या रांगेत बसावे लागते. कोणाला मोबाईल मध्ये डोके खूप खूपसून बसावे लागते, असा टोलाही त्यांनी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव न घेता लगावला. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर कशा पडतील असे सरकारचे धोरण आहे.

लोकशाही जिवंतच ठेवायची नाही असा निश्चय महायुती सरकारने केलेला दिसतो. त्या निमित्ताने इच्छुक आणि कार्यकर्त्यांना देखील निवडणूक लांबणीवर पडण्याची सवय लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही. राज्य सरकारने लोकशाहीची खेळणी थांबवावे आणि त्वरित निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी थोरात यांनी केली.

तसंच कोणताही कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. शेतकऱ्यांचे काय हाल आहेत याच्याशी त्याला काहीही देणे-घेणे नाही. आजही राज्यात सगळीकडे खते मिळत नाहीत. सर्रासपणे खतांची लिंकिंग सुरू आहे. त्यावर मंत्र्यांनी काय कारवाई केली असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT