BJP Politics : पृथ्वीराज पाटील एकटेच गेले नाहीत... उरलसी सुरली काँग्रेसच मोकळी केली, दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

congress leader Prithviraj Patil Join BJP : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बुधवारी (ता. 13) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा पक्ष प्रवेश मुंबईत पार पडला. यावेळी त्यांच्याबरोबर सांगलीतील अनेक दिग्गजांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.
congress leader Prithviraj Patil Join BJP
congress leader Prithviraj Patil Join BJP
Published on
Updated on

Summary :

  1. सांगली काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  2. त्यांच्या सोबत सांगलीतील अनेक दिग्गज नेते आणि शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले.

  3. या प्रवेशामुळे काँग्रेसला सांगली जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

Sangli News : सांगली काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा पक्ष प्रवेश मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थित झाला. यावेळी सांगली जिल्ह्यातील अनेक दिग्गजांसह शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार खाडे, जयश्री पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे समित कदम उपस्थित होते.

आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर सध्या जिल्ह्यात मोठी राजकीय हालचाली होताना दिसत असून मोठे राजकीय प्रवेश आज मुंबईत पार पडले. दरम्यान पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशावर सोमवारी रात्रीच शिक्कामोर्तब झाला होता. त्यांच्या घरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्नेह भोजन केले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर ते मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप प्रवेश करतील असे बोलले जात होते. त्याप्रमाणे आज (बुधवारी) दुपारी तीन वाजता मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच त्यांचा पक्षप्रवेश झाला.

congress leader Prithviraj Patil Join BJP
Prithviraj Patil : बसायलाही जागा नाही... तरी काँग्रेस जिल्हाध्यक्षांची भाजपमध्ये उडी; CM फडणवीसांनी असा कोणता शब्द दिलाय?

यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब (बापू) गुरव, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. प्रताप पाटील, माजी उपमहापौर डॉ. राजेंद्र मेथे तसेच माजी नगरसेवक, सरपंच, माजी सरपंच, काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सर्वांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशामागे सांगलीचा विकास हाच ध्यास असल्याचे सांगत पाच मागण्या फडणवीस यांच्याकडे केल्या. त्याचे निवेदनही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी त्या मागणी पूर्ण केल्या जातील असा शब्द दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांनी सांगलीला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा, शहराच्या प्रदुषण मुक्तीसाठी योजना, अॅग्रो टेक हबच्या निर्मिती, सांगलीच्या पर्यटनाला गती, वर्ग दोन जमिनींचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नासह पूराच्या मुद्द्यावर चर्चा केली. यातील पूर निवारणासाठी राज्य शासनाने 600 कोटींची तरतुद केल्यासह शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्यासह प्रस्ताव तयार करा, तो राज्य शासनाकडे पाठवू अशी पालकमत्र्यांनी ग्वाही दिला. यामुळे पाटील यांचा प्रवेश होताच सांगलीला दोन मोठे गिफ्ट मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

congress leader Prithviraj Patil Join BJP
Prithviraj Chavan BJP: पृथ्वीराज चव्हाणांना घेरण्याची भाजपची पूर्ण तयारी; कऱ्हाड शहरातील मोठा गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत

FAQs :

प्र.१: पृथ्वीराज पाटील कोण आहेत?
उ: ते सांगली काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

प्र.२: प्रवेश सोहळा कुठे झाला?
उ: मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

प्र.३: काँग्रेसला सांगलीत फटका का बसला?
उ: दिग्गज नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची संघटना कमकुवत झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com