Ajit Pawar Marathwada News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Banjara Reservation : बंजारा समाज कधीच आदिवासी होऊ शकत नाही, अजित पवारांचा मंत्री कडाडला

Narhari Zirwal statement : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं यासाठी बंजारा समाजाचे मोर्चे निघत आहेत. परंतु आदिवासीबांधवांचा याला कडाडून विरोध आहे. आम्हीही आंदोलन करु असा इशारा आदिवासींनी दिला आहे.

Ganesh Sonawane

Banjara reservation : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलेला आहे. असे असतानाच आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजही रस्त्यावर उतरला आहे. हैदराबाद गॅझेटिअरचा आधार घेत बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र आदिवासी आमदार व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बंजारा समाजाचा या मागणीला विरोध दर्शवला आहे.

बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाजाकडूनही तीव्र विरोध होत आहे. बंजारा समाज हा कधीच आदिवासी होऊ शकत नाही, आदिवासी होण्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्माला यावे लागते, असे सुनावत मंत्री झिरवाळ यांनी बंजारा समाजाला इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 26) नाशिकमध्ये आदिवासींच्या न्याय्य हक्क व संविधान संरक्षणासाठी आदिवासींची महापंचायत झाली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी मंत्री झिरवाळांनी यासंदर्भात संवाद साधला. बंजारा समाज कोणत्या अधिकारात आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहे असा सवाल झिरवाळांनी उपस्थित केला.

मंत्री झिरवाळ म्हणाले, याचा आम्ही अभ्यास केला असून या संदर्भात आम्ही बैठक घेतली. यात समाजातील अनेक तज्ज्ञ लोक सहभागी झाले होते. निवृत अधिकाऱ्यांनीही याचा अभ्यास केला आहे. बंजारा समाज हा कधीच आदिवासी होऊ शकत नाही. या समाजाला काही ठिकाणी धान्य वाहून नेणारा समाज म्हटले जाते. हैदराबाद गॅझेटिअरचा ते आधार घेत आहेत परंतु यात तशी कुठेही स्पष्टता नसल्याचे झिरवाळ म्हणाले.

संसदेतदेखील हा मुद्दा उपस्थितीत झालेला असून, तेथे नाकारण्यात आलेला आहे. संविधानाने सांगितले, असे कोणी म्हणू शकत नाही. संविधानाने सांगितले असे कोणी म्हणू शकत नाही.

पश्चिम महाराष्ट्रात व उत्तर महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू तसेच कायदेशीर मार्गाने संसदेत हा विषय मांडू. बंजारा समाजाचे मोर्चे निघत आहेत. छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये तीन किलोमीटरच्या रांगा दाखवतात. समाज कमी असतानाही सगळे एकत्र येऊन मोर्चा काढत आहेत. आमच्या मागे कुणीच नाही का? जेथे कमी तेथे आम्ही जाऊ. आम्ही सगळे आदिवासी एक आहोत. आता समाजाने बसून चालणार नाही असं झिरवाळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT