Hiraman Khoskar : जिथे योजना अपूर्ण दिसेल, त्याच गावात उपोषणाला बसेल : अजित पवारांच्या आमदाराचा इशारा

Ajit Pawar NCP : जलजीवन मिशनच्या बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी अभियंता गंगाधर निवडंगे यांना धारेवर धरलं व खडेबोल सुनावले.
Hiraman Khoskar And Ajit Pawar
Hiraman Khoskar And Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी नुकतेच नाशिक जिल्हा परिषदेत भेट देत पाणीयोजनांचा आढावा घेतला. जलजीवन मिशन अंतर्गत त्र्यंबकेश्वर-इगतपुरी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा पुरता बोजवारा उडाल्याचे सांगत आमदार खोसकरांनी संताप व्यक्त केला.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे यांना आमदार खोसकरांनी चांगलच निशाण्यावर घेतलं. निवडंगे यांची काम करण्याची मानसिकता उरलेली नाही. त्यांचा कार्यभार काढून घेण्यात यावा अशी सूचना आमदार खोसकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ओमकार पवार यांना केली.

निवडंगे यांचा कारभार तातडीने दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवा अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच आठ दिवसांत कारवाई न झाल्यास येत्या १० ऑक्टोबरपासून प्रत्येक योजनेला भेट देईन व योजना अपूर्ण असल्यास त्याच गावात उपोषणाला बसेन, असा इशारा आमदार खोसकरांनी दिला. या संदर्भात आठ दिवसांचा अल्टिमेटम खोसकरांनी दिला.

Hiraman Khoskar And Ajit Pawar
Eknath Khadse : मुख्यमंत्र्यांना आपल्या मंत्र्यांना सांगावं लागतं, हे दुर्दैवं.. एकनाथ खडसेंनी पूरस्थितीवरुन घेरलं

या मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल १०६ योजना राबविण्यात आल्या. परंतु ठेकेदारांनी स्वतः अंदाजपत्रक तयार केले आणि अधिकाऱ्यांनी ते डोळेझाक करून मंजूर केल्यामुळे आजही ४९ वाड्या-पाड्यांना पाणी मिळालेले नाही. आता पुन्हा अंदाजपत्रक तयार करून मंजुरीस विलंब केला जात असल्याचे आमदारांनी अधोरेखित केले.

कोणत्याही गावात गेलात तर महिलांची पहिलीच मागणी पाण्याबाबतची असते. पावसाळ्यातच अशी अवस्था असेल, तर पुढे गंभीर टंचाई निर्माण होणार असल्याचा इशारा आमदार खोसकर यांनी दिला. वन विभाग, पाटबंधारे, महावितरण किंवा राज्यस्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव त्वरित कळवावेत, त्याचा पाठपुरावा आपण स्वतः करू, असेही आमदारांनी सांगितले. गावनिहाय प्रलंबित कामांचा आढावा घेत त्यांनी प्रगतीची माहिती घेतली. यावेळी सीईओ पवार यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना चांगले झापले.

Hiraman Khoskar And Ajit Pawar
Jalgaon NCP News : PM मोदी अन् अमित शाहंकडे केली होती तक्रार; अखेर जळगावातील राष्ट्रवादीच्या नेत्याला बेड्या

यावेळी बैठकीला सीईओ ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) दीपक पाटील, कार्यकारी अभियंता निवडंगे यांच्यासह अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते. दरम्यान, बैठकीसाठी सरपंच आणि ग्रामसेवकांना देखील बोलावण्यात आले होते. मात्र अनेक ग्रामसेवक गैरहजर होते. यामुळे सीईओ पवार यांनी संबंधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले. (Nashik News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com