Balasaheb Thorat And Radakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhanudas Murkute Nagar : 'अशोक'च्या ऊसासाठी' भानुदास मुरकुटे आजी-माजी मंत्र्यांवर बरसले

Balasaheb Thorat And Radakrishna Vikhe Patil : "श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काचे पाणी पळवून वाळवंट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसावरून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. श्रीरामपूरच्या हक्काचे पाणी पळवून वाळवंट करणार्‍यांना ऊस न घालता आपल्या हक्काची कामधेनू 'अशोक'ला सभासदांनी ऊस घालावा, असे आवाहन मुरकुटे यांनी केले आहे.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी विखे आणि थोरात यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काचे पाणी पळवून वाळवंट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe Patil) आणि बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचे ऊस उपलब्धतेसाठी श्रीरामपूर तालुक्यात कोणतेच योगदान नाही. त्यामुळे श्रीरामपूरमधील अशोक कारखान्याच्या सभासद शेतकर्‍यांनी प्रवरा आणि संगमनेर कारखान्याला ऊस न देता आपल्या भागातील कामधेनू 'अशोक'ला ऊस द्यावा, असे आवाहन केले आहे. (Bhanudas Murkute Nagar)

'मी आमदार असताना विखेंनी प्रवरा परिसरातील डाव्या कालव्यांवर आडवे बांध घातले होते. हे बांध मी सुरूंग लावून उद्धवस्त केले. प्रवरा डावा कालव्याचे नूतनीकरण करून वहन क्षमतेत दीडपट वाढ केली. हजारो एकराचे रद्द झालेल्या ब्लॉकचे फेरवाटप करून आपल्या भागाचे पाणी सुरक्षित केले. पाण्यासाठी संघर्ष केला. आंदोलन करून तुरुंगवास पत्करला आहे", असे मुरकुटे( Bhanudas Murkute) यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'प्रवरा' आणि 'गोदवरी' नदीवर कोल्हापूरचे बंधारे घालून पाणी वाढवले. ऊस वाढीसाठी पाणी संघर्ष केल्याने 36 हजार टनावरून तो आता 12 लाख टनापर्यंत गेला आहे. आता या ऊसावर 'प्रवरा' आणि 'संगमनेर' कारखान्याचा डोळा आहे. हे दोघे नेते सत्तेच्या जोरावर आपल्या भागावर सतत अन्याय करत आहेत', असा देखील आरोप मुरकुटे यांनी केला. (Balasaheb Thorat And Radakrishna Vikhe Patil)

'आमदार बाळासाहेब थोरात यांनी सत्तेच्या जोरावर निळवंडे ते ओझर या दरम्यान प्रोफाइल वॉल बांधून आपल्या भागाचे पाणी ओझर बंधार्‍यांवर अडवल्याचा आरोप माजी आमदार मुरकुटे यांनी केला आहे. सात नंबर अर्जाद्वारे पाणी घेण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. यावरून पाणी संघर्ष अटळ आहे. यासाठी आपल्या भागाचे कामधेनू असलेल्या अशोक कारखान्याचे जतन केले पाहिजे. बाहेरून ऊस आणावा लागेल', असे माजी आमदार मुरकुटे यांनी म्हटले आहे. (Ahmednagar Political News).

SCROLL FOR NEXT