Sanjay Raut : खासदार राऊतांनी नगरच्या आमदाराची केली दाऊदशी तुलना; म्हणाले...

Sanjay Raut On Sangram Jagtap: गुंडगिरी विरोधात खासदार राऊत यांनी नगरच्या रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नगर शहरातील गुंडगिरीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (अजित पवार गट) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन यांच्या मुंबईतील गुंडगिरी, ताबेमारीशी नगरमधील गुंडगिरीची तुलना केली. आमदार संग्राम जगताप यांना ताबेमारी टोळीचा प्रमुख, असा उल्लेख संजय राऊत यांनी केला. (MP Sanjay Raut On NCP MLA Sangram Jagtap in Ahmednagar)

नगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठकारे पक्षाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यानिमित्ताने संजय राऊत नगरमध्ये आले होते. मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत नगरमधील गुंडगिरी, झुंडशाही, ताबेमारी प्रकरणावर भाष्य करत चिंता व्यक्त केली. संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, माजी आमदार विजय औटी, उपनेते साजन पाचपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर यावेळी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
LokSabha Elections 2024 : राऊतांनी वाढवली पवारांची धडधड; ठाकरे गट किती जागा लढवणार? आकडा केला जाहीर

शिवसेनेमध्ये पोरकेपणाची जाणिव होती. संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी आलो आहे. अनिल राठोड यांचा विधानसभेतील पराभव धक्कादायक होता. तो का आणि कसा घडवण्यात आला, हे देखील सगळ्यांना माहीत आहे. यानंतर राज्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, असे सांगून संजय राऊत यांनी नगर शहरातील गुंडगिरीवरून संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला.

राऊत म्हणाले, "नगरमध्ये संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्था बिघडली आहे. येथे गुंडाचे राज्य सुरू आहे. नगरमध्ये गुंडशाही, झुंडशाही हीच लोकशाही झाली आहे. त्यासाठी बहुदा हेच गुंड सरकार पक्षामध्ये सहभागी झाले आहेत. येथील आमदार आणि त्यांच्या गुंडांच्या इतक्या विचित्र प्रकरणांच्या फाईल दोन दिवसात माझ्यासमोर येऊन पडल्या आहेत की, बिहारमधला हा एखादा भाग आहे का ? असे वाटू लागले आहे.

Sanjay Raut
LokSabha Election 2024 : धुळे मतदारसंघासाठी काँग्रेसने थोपटले दंड; नेते म्हणतात 'या' कारणाने विजय निश्चित...

दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन मुंबईत होते. ते पळून गेले. शिवसेनेने त्यांना पळून लावले. ते मुंबईत जमिनी बळकावयाचे. ताबा मारायचे. आता येथे नगरमध्ये खूप वर्षांनी ताबेगिरी शब्द ऐकला. दाऊदच्या गॅंग हे करायचे. माफियागिरी करायचे. खंडण्या, जमिनी बळकावे, दहशत नगरसारख्या शहरामध्ये व्हावे, लोक दहशतीखाली जगावे. लोकांना काम, धंदा, व्यापार करायची भीती वाटावी. हे शहर सोडून जात आहे. हे राज्याच्या एका प्रमुख शहराची ही स्थिती आहे, असं ते म्हणाले.

राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल, तर राज्यात गृहमंत्री आहे की नाही? मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि यांचे कोणी पोशिंदे असतील, तर ते काय करत आहे ? इकडाचा ताबेगिरीचा पैसा त्यांना जातोय का? त्यांना कोण पाठिशी घालतंय ? इकडले खासदार, महसूलमंत्री आहेत की नाही ? लोकांनी किती काळ दहशतीखाली जगायचे. अलीकडच्या काळात नगरमध्ये किंवा जिल्ह्यात किती खून झाले. कालच एका वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून झाल्याकडे लक्ष वेधून नगरमधील गुंडगिरीविषयी संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली.

'...तर नगरच्या रस्त्यावर तमाशा होईल'

'खंडणीसाठी देवस्थानाच्या जमिनी लुटल्या गेल्या. शैक्षणिक भूखंड लुटले गेले. देवस्थानाच्या जमिनी तरी सोडा, एकाबाजूला राम मंदिराचे मार्केटींग करत आहे. राम राम करत आहे आणि देवस्थानच्या जमिनी इकडचे आमदार लुटत आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं अडवली जात आहे. इकडच्या आयुक्तांना शिवसनेचा इशारा आहे. या गुंडगिरी, झुंडशाहीला अनिलभैय्या असते, तर त्यांनी टक्कर दिली असती.

आतापर्यंत दिली होती. राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी मला भेटले आहे. पोलिस प्रशासनाला माझे आवाहन आहे. गुंडगिरी, ताबामारीवर कशी छापामारी करायची आहे, हे शिवसेनेला माहित आहे. प्रशासनाला, पोलिस प्रशासनाला इशारा आहे की, ही ताबामारी, गुंडगिरी थांबली नाही, तर शिवसेना रस्त्यावर येईल. मुंबईत आम्ही ज्यापद्धतीने लढतोय, त्याचपद्धतीने नगरच्या रस्त्यावर तमाशा होईल', असा इशारा संजय राऊतांनी दिला.

'तुम्ही गुंड, तर आम्ही महागुंड!'

महाविकास आघाडीकडून आमदारांच्या गुंड टोळ्यांच्या ताबामारी, गुंडगिरीविरोधात विराट मोर्चा काढावा. पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर काढावा. ताबामारी टोळीचे प्रमुख आहेत, ते आमदार यांच्या घरावर काढावा आणि इशारा द्यावा. याची तयारी सुरू आहे. नगरमधील गुंडगिरी, लूटमारी, झुंडशाही याविरोधात आवाज उठवावा. प्रत्येक माणूस नगरच्या गुंडगिरीविरोधातच तक्रार करत आहे. नगरची गुंडगिरी, झुंडगिरी याविषयीच सांगत आहे.

भारतीय जनता पक्ष नैतिकतेच्या गोष्टी करत आहे. आता लढाईला सुरूवात झाली. शिवसेना जेव्हा गुंडगिरीविरुद्ध उतरते, ती मोडूनच काढते. जा हवे ते करा. रस्त्यावर तुम्ही उतरतो की, आम्ही उतरतो. तुम्ही गुंड आहात, तर आम्ही महागुंड आहोत, असे सांगून लवकरच महाविकास आघाडीचा विराट मोर्चा नगरमध्ये येईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

नवीन सरकारमध्ये नगरच्या आमदारांची गुंडगिरी

महाविकास आघाडीमध्ये नगरचे आमदार होते. त्यावेळी कोणीच का बोलत नव्हते. या प्रश्नावर राऊत म्हणाले, अनिल राठोड हे नगरच्या गुंडगिरीविरोधात लढत होते, हे सर्वांना माहीत आहे. नवीन सरकार आल्यापासून त्यांची गुंडगिरी वाढली आहे, असे मी सांगेल.

नवीन सरकारमध्ये इकडे, तिकडे झाले. यानंतर कोणाचेही कोणावरही नियंत्रण राहिले नाही. आमचा बॉस सागर बंगल्यावर अशी एका आमदाराची भाषा आहे. त्यामुळे कोणाचा बॉस कोठे आहे, हे स्पष्ट होऊ द्या गुंडगिरीबाबतीत, असे राऊत यांनी म्हटले.

(Edited By-Ganesh Thombare)

Sanjay Raut
Sharad Pawar : ठाकरे गटाची पहिली परीक्षा शरद पवारच घेणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com