Bharat Gavit & Shirishkumar Naik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bharat Gavit Politics: भाजप नेते भरत गावित यांचा काँग्रेस आमदार नाईक यांच्यावर सनसनाटी आरोप!

Bharat Gavit Politics; MLA ShirishKumar Naik criticized Gavit on tribal sugar factory issue-नवापूरच्या विधानसभा निवडणुकी आधीच आदिवासी साखर कारखान्याचा झाला राजकीय आखाडा

Sampat Devgire

Naike Vs Gavit News: नवापूर विधानसभेची निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. काँग्रेस आमदार शिरीष कुमार नाईक आणि भाजपचे भरत गावित यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष गावीत यांनी आमदार नाईक यांची चांगलीच कोंडी केली आहे.

नाकोडा (नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना यंदा राजकीय आखाडा बनला आहे. त्याला निमित्त ठरले आहे, कारखान्यावरील कर्जाचे प्रकरण. सध्या हा कारखाना ताहराबाद येथील द्वारकाधीश कारखान्याला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या या निर्णयावर आमदार नाईक यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार नाईक यांच्या पॅनेलचा पराभव झाला. कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप नेते भरत गावीत यांचे निवड झाली.

कारखान्याची सत्ता गावीत यांच्याकडे आल्याने तालुक्याचे राजकारण आमदार नाईक यांची पिछेहाट झाली. या निमित्ताने आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आणि पूर्वश्रमीचे काँग्रेसचे मात्र सध्या भाजपचे नेते असलेले भरत गावीत या दोघांनीही काँग्रेसचे आमदार नाईक यांची चांगलीच राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

हा कारखाना तारण ठेवून संबंधित खाजगी संस्थेला कर्ज हवे आहे. त्यासाठी कारखान्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याच्या हालचाली सुरू आहे. या संदर्भात भाजपनेते गावीत यांनी संचालक मंडळाची बैठक बोलावली त्यात कारखाना चालविण्यासाठी नियमित कर्ज घेण्यासाठी मान्यता देण्यात आली.

मात्र संबंधीत कारखाना चालविणारी संस्था दीर्घकाळासाठी मोठे कर्ज घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला कारखान्याच्या संचालक मंडळांनी नकार दिला. यावरून विधानसभा निवडणुकीआधीच आमदार नाईक आणि भरत गावीत यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

काँग्रेस नेते आमदार नाईक यांनी भरत गावित यांना कारखाना चालविण्यात स्वाऱस्य नाही. ते कारखान्याची कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. त्यांना कारखान्याच्या कामकाजाविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळेच ते कामकाजापासून अलिप्त राहतात, असा आरोप केला आहे.

आमदार नाईक म्हणाले, गावीत यांना हवे असल्यास कारखाना चालविण्यासाठी आम्ही मदत करण्यास तयार आहोत. तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात काहीही कमीपणा नाही, अशी भूमिका घेतली आहे.

कारखान्याचे अध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार असलेले भरत गावित यांनी मात्र आमदार नाईक यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. आमदार नाईक यांना कारखाना चालविण्यापेक्षा हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात अधिक रस होता. त्यामुळे ते आरोप करीत आहेत.

आम्ही मात्र कोणताही निर्णय साखर कारखाना आणि आदिवासी शेतकरी यांच्या हितासाठीच घेणार आहोत. संस्थेच्या हितापलीकडे अन्य कोणतेही काम आम्ही करणार नाही. या भूमिकेबाबत नाईक यांचा विरोधका असा प्रश्न उपस्थित केला आहे.

विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. या निमित्ताने नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार नाईक आणि भाजपचे नेते गावीत यांसह अन्य इच्छुक सक्रिय झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच आदिवासी साखर कारखान्याच्या प्रश्नांवरून हे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात दंग आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या आखाड्याआधीच डाकोर येथील आदिवासी साखर कारखान्याच्या कामकाजावरून हे दोन्ही नेते भिडले आहेत. या निमित्ताने विधानसभेची चुरस आणि प्रचार दोन्हीची झलक पाहायला मिळत आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT