Eknath Shinde politics: मुख्यमंत्री शिंदे गटाला मोठा धक्का, निवडणुकीच्या तोंडावर शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष!

Eknath Shinde politics; Big shock for Shinde Group, hundreds of members resign-चांदवड येथील तालुकाप्रमुखाxसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिले शिवसेना शिंदे गटाचे राजीनामे.
Vikas Bhujade & Eknath Shinde
Vikas Bhujade & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभाराचा मोठा फटका शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाला बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा धक्का बसला. वरिष्ठ विरुद्ध कनिष्ठ पदाधिकाऱ्यांतील विसंवादाची झळ पक्षाला चांदवडमध्ये बसली.

शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या चांदवड तालुकाप्रमुख आणि या तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी करणाऱ्या विकास भुजाडे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. श्री भुजाडे यांच्यासमवेत मतदारसंघातील सर्व बूथ प्रमुख आणि तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय झाला. त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जातो. विशेषता देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू होती.

या संदर्भात उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी चांदवड मतदार संघातून उमेदवारी करणार, असे संकेत दिले होते. सध्या श्री भुजाडे यांनी केलेले बंड हे थेट संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या विरोधात मानले जाते.

Vikas Bhujade & Eknath Shinde
Suhash Kande Politics: सुहास कांदे यांचे थेट आव्हान, पंकज, समीर नको, छगन भुजबळांनीच माझ्याविरुद्ध लढावे"

श्री भुजाडे यांना पदमुक्त करण्याचा निर्णय श्री चौधरी यांच्याकडूनच यापुर्वी झाला होता. त्यानंतर काही नवे पदाधिकारी देखील नियुक्त करण्यात आले. त्यावर श्री. भुजाडे यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे तसेच वरीष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने काल सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिली. या संदर्भात श्री भुजाडे यांच्या बाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे विविध तक्रारी आल्याने हा निर्णय घेतल्याचे संपर्क नेते श्री चौधरी यांनी स्पष्ट केले होते.

चांदवड मतदार संघाच्या राजकारणात भौगोलिक विभागणी आणि विविध नव्या नेत्यांचा उदय यामुळे मोठा राजकीय गुंता निर्माण झाला आहे. यातील अनेकांना आमदारकीचे स्वप्न देखील पडू लागली आहेत. त्यात चांदवड, देवळा विकास आघाडीची भर पडली आहे.

Vikas Bhujade & Eknath Shinde
Suhash Kande Politics: सुहास कांदे यांचे थेट आव्हान, पंकज, समीर नको, छगन भुजबळांनीच माझ्याविरुद्ध लढावे"

श्री भुजाडे यांनी शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवीत राजीनामे दिले आहेत. त्यांनी आता चांदवड देवळा तालुका विकास आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी आगामी निवडणुकीत योग्य त्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.

यामध्ये श्री भुजाडे यांना किंगमेकर होण्याचे वेध लागले आहेत. हे लपून राहिलेले नाही. अर्थात त्यांची तेवढी क्षमता आहे का? हा चर्चेचा विषय आहे. मात्र श्री भुजाडे हे पालकमंत्री दादा भुसे आणि भाजपच्या नेत्यांशी जवळीत असलेले नेते आहेत.

त्यामुळे त्यांचा आगामी राजकीय कार्यक्रम काय असू शकेल, हे स्पष्ट होते. या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाला हा धक्का मानला जातो. एकंदर महायुतीला मात्र त्यातून फारसे नुकसान होण्याची शक्यता नाही, असे बोलले जाते. स्वतंत्र अस्तित्वासाठी शिंदे गटाच्या विरोधात हे बंड केले असावे असाही संदेश जातो.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com