Bhaskar Bhagare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhaskar Bhagare Politics: खासदार भास्कर भगरेंचा सवाल; केंद्र सरकार कांदा निर्यात शुल्क केव्हा रद्द करणार!

Bhaskar Bhagare; Onion farmers in crisis, will the central government pay attention or not?-आठवडयाभरात नाशिकला कांद्याचे दर सहाशे रुपयांनी कोसळल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Sampat Devgire

Onion farmers News: भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांनी यापूर्वी कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत केंद्र शासनाला विनंती देखील करण्यात आली आहे. मात्र सरकार त्याकडे कधी लक्ष देणार? याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत कांद्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. सिन्नर येथे जवळपास ६०० रुपयांनी भाव कमी झाले. त्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्र शासनाला कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे केव्हा लक्ष देणार, असा प्रश्न केला आहे. या संदर्भात त्यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित केला. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केल्याने यापूर्वी शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आले आहे. मात्र हे शुल्क शून्यावर आणण्याची गरज आहे.

याबाबत अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र सरकार त्याकडे पूर्णता दुर्लक्ष करीत आहे. केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल, असा दर देण्याची व्यवस्था केली पाहिजे. केंद्र शासनाकडून बाजार हस्तक्षेप योजना आणि अन्य माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. त्याचा फायदा अन्य देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.

काही देश भारतीय कांद्यावर आयात शुल्क लावत असल्याने त्याकडेही सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार भगरे यांनी केली. गेले आठवडेभर कांद्याचे दर सातत्याने कमी होत आहेत. आठवड्यापूर्वी २२०० रुपये प्रती क्विंटल हा दर सध्या पंधराशे रुपयांवर आला आहे. उन्हाळ कांद्याची आवक लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आवक वाढून हे दर आणखी खाली जाण्याची भीती आहे.

कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिल्यास आवक जावक नियंत्रणात येऊन कांद्याला चांगला दर मिळू शकेल. याबाबत खासदार भगरे यांचं विविध खासदारांनी यापूर्वी संसदेत आवाज उठवला होता. त्याला केंद्रशासन प्रतिसाद देणार का याची उत्सुकता आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT