Kanifnath Yatra controversy : मढी येथील कानिफनाथांची यात्रा पुन्हा वादात; मांसाहारानंतर आता प्रसाद विक्रीला बंदी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Madhi Gram Panchayat Muslim traders Pathardi Kanifnath Yatra controversy : पाथर्डीतील कानिफनाथ यात्रेत व्यापाऱ्यांना सहभागी होताना मढी ग्रामपंचायतीने आचारसंहिता घालून दिल्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
Kanifnath Yatra
Kanifnath YatraSarkarnama
Published on
Updated on

Kanifnath Yatra latest news : राज्यासह देशात भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डीतील मढी इथल्या कानिफनाथ यात्रेला आजपासून सुरवात झाली. मढी ग्रामपंचायतीने यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना केलेल्या बंदीचा ठराव राज्यात गाजला.

प्रशासनानंतर हा ठराव रद्द केला. त्यानंतर न्यायालयाने देखील यावरून फटकारले. पण आज होळी सणापासून कानिफनाथ यात्रेला सुरवात झाली असताना, मढी ग्रामपंचायतीने यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी केलेल्या आचारसंहितेमुळे पुन्हा वाद उफळण्याची चिन्हं आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी (ता. पाथर्डी) इथं कानिफनाथ यात्रेला आजपासून सुरवात झाली. यावर्षी मढी यात्रा चांगलीच चर्चेत राहिली आहे. ग्रामसभेने ठराव करून सुरवातीला मुस्लिम (Muslim) व्यापाऱ्यांना यात्रेत दुकानांना बंदी घालण्यात आली. या ठराव राज्य पातळीवर गाजला.

Kanifnath Yatra
Sarpanch Reservation Lottery: गावकारभाराचं ठरलं तर...! सरपंचपदाचं आरक्षण जाहीर, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

भाजप (BJP) मंत्री नीतेश राणे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या ठरावाला पाठिंबा दिला. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्वोच्च न्यायालयाने ग्रामपंचायतींना सर्व अधिकार दिल्याचे सांगत, अंग काढून घेतले. प्रशासनाने यात समन्वयाची भूमिका बजवावी, असे सांगितले.

Kanifnath Yatra
Raju Shetti And Jayant Patil: जरा चुकलंच..! राजू शेट्टींनी लोकसभेला 'मुत्सद्दी' जयंतरावांचा सल्ला ऐकला असता; तर...

जिल्हा प्रशासनाने हा वादग्रस्त ठराव रद्द केला. पण मढी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मरकड यांनी आम्ही पुन्हा ठराव घेऊ, असा इशारा दिला होता. कानिफनाथ यात्रा आजपासून सुरू होताच, मढी ग्रामपंचायतीने नवीन नियमांची आचारसंहिता समोर आणली असून, त्याच्यातील नियमांमुळे वाद उफाळण्याची शक्यता आहे.

मढी ग्रामपंचायतीने पुन्हा यात्रेसंदर्भात आचारसंहिता लागू केली आहे. यातून पुन्हा एकदा ही आचारसंहिता वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. जे दुकानदार मढी यात्रेत व्यवसाय करणार आहेत, त्यांच्यासाठी विविध नियम लादले आहेत. पाथर्डीत कानिफनाथ यात्रेला सुरवात झाली. तरी जून एकाही व्यावसायिकाने दुकान लावलेले नाही. त्यामुळे आता या नियमांवरून पुन्हा एकदा वाद उफाळण्याची चिन्हं आहेत.

काय आहेत नियम

व्यवसायिकांना जीएसटी नंबर, शॉप ॲक्ट परवाना, उद्योग आधार, अन्न आणि औषध प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र, यासह व्यावसायिकावर कोणताही गुन्हा नोंद नसल्याचा पोलिसांचा दाखलाही मागवण्यात आला आहे. त्याचबरोबर जे व्यावसायिक रोज आंघोळ करतील, धर्माचे पालन करतील, मांसाहार करून प्रसाद विकणार नाहीत, धर्मांध जिहादी लोकांची दुकाने लावून देणार नाहीत, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी देखील या आचारसंहितेला दुजोरा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com