Balasaheb Thorat, Chhagan Bhujbal, Nana Patole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : थोरात-पटोले वादात भुजबळांची उडी: पटोलेंवर गंंभीर आरोप

Balasaheb Thorat Vs Nana Patole: नाना पटोले यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे कॉंग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे

सरकारनामा ब्युरो

Nashik News : राज्यातील सत्तांतराला जवळपास आठ महिने उलटून गेले. पण अजूनही याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना दिसतात. राज्यात काही घडले की सत्तांतराचा मुद्दाही चर्चेत येतो. आताही नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकार कशामुळे कोसळले, यावरुन राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका टीप्पणी सुरु आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीतील सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरी आणि या दरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे कॉंग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे कॉंग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. इतकेच नव्हे तर बाळासाहेब थोरातांसह कॉंग्रेसमधील इतर नेत्यांनीही पटोलेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

अशात शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले यांच्यातील वादावर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना कुणालाही विश्वासात घेतले नव्हते. यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले, असा आरोप असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ म्हणाले की, पटोलेंच्या राजीनाम्यानंतर जवळपास सात-आठ महिने विधानसभा अध्यक्षपद कुणाला द्यायचे यावर निर्णय घेतला नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या. असा दावाही भुजबळांनी केला.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात गेल्या काही महिन्यापासून मतभेद होते. पण नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर मात्र हे मतभेद टोकाला गेले. पटोले यांनी जाणूनबुजून सत्यजीत तांबेंना तिकीट नाकारले, असा आरोप थोरात-तांबे कुटुंबियांकडून करण्यात आला. शिवसेनेनेही या वादात बाळासाहेब थोरातांची बाजू घेतली. एवढचं नाही तर कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या नेत्यांनीही पटोलेंविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT