Rajasthan Budget : अर्थसंकल्प सादर करताना मोठी चूक; मुख्यमंत्र्यांनी जुनाच अर्थसंकल्प वाचला, नेमकं काय घडलं?

Ashok Gehlot Mistakenly Read Old Budget: विरोधकांनी प्रचंड गदारोळ करत जोरदार घोषणाबाजी केली
Ashok Gehlot
Ashok Gehlot Sarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Budget News: राजस्थानच्या विधानसभेत गेहलोत सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाषण करताना अर्थसंकल्पाच्या जुन्याच ओळी वाचल्या. त्यामुळे विरोधकांनी प्रचंड गदारोळ करत जोरदार घोषणाबाजी केली.

गेहलोत सरकारने २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विधानसभेत मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पासंदर्भात जी प्रत देण्यात आली होती. त्यामध्ये काही पाने जुनीच होती. मुख्यमंत्री ८ ते १० मिनिटं जुनाच अर्थसंकल्प वाचत राहिले.

त्यानंतर मात्र हा प्रकार विरोधकांच्या लक्षात आला आणि आमदार हसू लागले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले.

Ashok Gehlot
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात खिंड सोडुन पळुन गेले : राधाकृष्ण विखे पाटील

या सर्व प्रकारवर अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी झालेल्या चुकीसाठी सभागृहाची क्षमा मागितली. गेहलोत म्हणाले, ''बजेट लीक ही एक मोठी घटना आहे. कृपया त्याची विश्वासार्हता कायम ठेवा. एक जास्तीचे पान आले होते. त्यामुळे हा प्रकार घडला, मात्र, मी वाचत असलेल्या अर्थसंकल्पीय भाषणाची प्रत तुम्हाला दिली जाईल'', असं गेहलोत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.

Ashok Gehlot
Kasaba By-Election : 'कसब्या'त आघाडीला मोठा दिलासा तर भाजपची धाकधूक वाढली; 'हे' आहे कारण

अर्थसंकल्प सादर करताना जुन्या अर्थसंकल्पाची पानं कसे आले? यावर चर्चा सुरू झाली असून या प्रकाराला अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे झालेल्या या प्रकारनंतर अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com