Bhusawal firing Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhusawal firing: माजी नगरसेवक हत्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या मुख्य आरोपीच्या मुसक्या

Mangesh Mahale

Nashik News, 31 May: कारमधून प्रवास करणारे माजी नगरसेवक आणि त्यांच्या मित्रावर गोळीबार (Bhusawal firing) करुन त्यांची हत्या करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीच्या नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मुसक्या आवळल्या.

काल (गुरुवारी) मध्यरात्री सापळा रचून मोठ्या शिताफीने नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने द्वारका येथून त्याला अटक केली. करण परतुडे असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे, मॅगझिन, पाच जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

कारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुसावळ शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास कारमध्ये बसलेले माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. यात दोघांचाही मृत्यु झाला होता. यामुळे भुसावळ शहर हादरलं होते. दोघांच्या हत्येनंतर गुरुवारी शहरात बंद पाळण्यात आला होता.

या हत्येनंतर जळगाव पोलिसांची विविध पथके हल्लेखोऱ्यांच्या शोधात होती. आठ संशयितांपैकी एकाला भुसावळमधून तर दुसऱ्याला धुळे जिल्ह्यातील साक्रीमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गोळीबार करणारा मुख्य संशयित हल्लेखोर हा मात्र फरार होता.

नाशिकच्या गुंडाविरोधी पथक शहरात रात्री गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांना सापला रचला. सहायक पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या पथकाने करण परतुडे याला शस्त्रांसह अटक केली. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT