Gayatri Bhangale addressing a public gathering in Bhusawal before her disqualification, highlighting the caste certificate controversy. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhusawal Municipality : भुसावळ पालिकेत सत्तानाट्य ; राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळेंचे पद गेले, अखेर भाजपच्या शैलजा नारखेडेंकडे सूत्रे

Shailaja Narkhede Assumes Charge in Bhusawal Municipality : प्रभारी का होईना पण सध्या भाजपने भुसावळ नगरपालिकेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर राज्य शासनाने गायत्री भंगाळे-गौर यांना अपात्र ठरविल्याने भाजपने संधी साधली.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : भुसावळ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या गायत्री भंगाळे-गौर या भाजपच्या उमेदवार व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्या होत्या. भंगाये यांनी तब्बल एक हजार ८४७ मतांनी सावकरेंचा पराभव केला होता. मात्र, भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांना आपले पद गमवावे लागले आहे.

भंगाळे यांचे नगराध्यक्षपद गेल्यानंतर पालिकेची सूत्रे हातात घेण्यासाठी भाजपने जाळे टाकले होते. त्यात भाजपला यश आलं आहे. अखेरीस नगरपालिकेत अधिक संख्याबळ असलेल्या भाजपच्या उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहे.

जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर राज्य शासनाने गायत्री भंगाळे-गौर यांना अपात्र ठरविले. नगराध्यक्षा अपात्र असल्याने कायद्याला धरून उपनगराध्यक्षा याच प्रभारी नगराध्यक्षा असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शैलजा नारखेडे यांनी सोमवारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. यावेळी भाजप व युतीच्या नगरसेवकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

भंगाळे यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असली, तरी खंडपीठात जातपडताळणीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर सहा आठवड्यांनी यासंदर्भात अंतिम सुनावली ठेवली आहे. तोपर्यंत भंगाळे यांच्याविरोधात कुठलीही कारवाई होणार नसल्याने त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. दरम्यान या घडमोडींमुळे उन्हाच्या पाऱ्याप्रमाणेच भुसावळमील राजकारणाचा पाराही वाढला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगितले, की मुळात जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेले पत्र न्यायालयाच्या निर्णयापूर्वीचे होते, ते आम्हाला मिळालेले नाही. न्यायालयाचा अंतिम निर्णय आलेला नाही. त्यामुळे पदभार दिलेला नसल्याने गायत्री भंगाळे याच भुसावळच्या नगराध्यक्षा आहेत. भाजपाला गुलाल उधळवू द्या, फटाके फोडू द्या, हे त्यांचे मुंगेरीलालचे स्वप्न आहे. प्रभारी नगराध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या कुठेही ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT