Ex MLA Farooq Shah & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Farooq Shah: माजी आमदार फारुक शाह यांनी सोडली 'एमआयएम'ची साथ, शहराचे राजकारण बदलणार?

Farooq Shah Quits AIMIM: भाजपचे कट्टर विरोधक माजी आमदार फारुक शाह यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश.

Sampat Devgire

Former MLA Farooq Shah Leaves MIM: ‘एमआयएम’ पक्षाचे माजी आमदार फारुक शह यांनी मंगळवारी मोठा निर्णय घेतला. शहरातील भारतीय जनता पक्षाशी सातत्याने संघर्ष करणारे माजी आमदार शाह आता महायुतीचा घटक बनले आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘एमआयएम’ पक्षाचे नेते असा असउद्दीन ओवॆसी यांना धुळे शहरात मंगळवारी मोठा धक्का बसला. गेले काही दिवस शहरातील माजी आमदार फारुक शाह आणि ‘एमआयएम’च्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शाह हे पक्षांतर करतील अशी चर्चा होती.

मंगळवारी माजी आमदार शाह यांनी ओवेसी यांच्या पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण तसेच धुळे शहरातील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार फारुक शाह (Farooq Shah) हे गेले काही वर्ष सातत्याने धुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष करीत होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना प्रखर विरोध सहन करावा लागला. धुळे शहरातील राजकारणात भारतीय जनता पक्षाने केलेल्या राजकीय व्यवहरचनेत शाह हे एकटे पडले होते.

आगामी धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला हा मोठा फायदा झाला आहे. मात्र भाजपचे (BJP) कट्टर विरोधक असलेले माजी आमदार शहा हे आता महायुतीचे घटक बनले आहे. यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार शरद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे.

महायुतीत विरोधी पक्षातील नेत्यांना प्रवेशासाठी दारे खुली ठेवण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना प्रवेश देताना वादग्रस्त आणि तक्रारी असलेल्या नेत्यांनाही वरिष्ठ नेत्यांकडून उत्साहाने स्वागत होत आले आहे. त्यामुळे धुळे शहरातील राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

आगामी काळात विशेषता महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) पक्षाला त्याचा काही प्रमाणात फायदा होईल. मात्र महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपची भूमिका काय असेल? याची उत्सुकता आहे. अनेक कार्यकर्ते हिंदुत्वाचे कार्ड धुळे शहरात वापरत आले आहे. या स्थितीत आगामी काळात महायुतीचे राजकारण धुळे शहरात वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT