Sharad Pawars NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : अजितदादांना मोठा धक्का, नाना महालेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Ajit Pawar NCP Nashik News : विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज नाशिकमध्ये मोठा धक्का बसला.

Sampat Devgire

Nashik News, 7 July : विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज नाशिकमध्ये मोठा धक्का बसला. नाशिकमधील विभागीय अध्यक्ष नाना महाले यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष असलेले नाना महाले यांनी रविवारी (ता.7 जुलै) बारामती येथे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.महाले हे भुजबळ यांचेही विश्वासू सहकारी होते. त्यांच्या या निर्णयाने उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.

महाले हे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक आहेत. त्यांनी यापूर्वी नाशिक (Nashik) पश्चिम मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी केली होती. या निर्णयाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट बचावात्मक परिस्थितीत आला आहे.

विशेषतः लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला मतांची मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. यातील काही आमदारांनी यापूर्वीच शरद पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. आगामी काळात अजित पवार गटातील विविध पदाधिकारी आणि नेते पक्ष सोडण्याची शक्यता आहे, असे बोलले जाते.

तर बारामती येथील महाले यांच्या प्रवेश सोहळ्याला शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हा अध्यक्ष गोकुळ पिंगळे, माजी आमदार नितीन भोसले यांचा विविध पदाधिकारी उपस्थित होते. जेष्ठ नेते शरद पवार यांनी या पदाधिकाऱ्यांची आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली.

राज्यात पक्षाला अनुकूल स्थिती आहे. समाजातील शेवटच्या घटकांसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामे करावी. त्याचा निश्चित आणि अनुकूल परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसून येईल, असा संदेश शरद पवार यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT