Workers from Nashik’s industrial areas closely follow the Bihar election results, highlighting how Bihar politics influences migrant communities Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bihar Election Results 2025 : निकालाची उत्सुकता शिगेला, महाराष्ट्रातील बिहारी कामगारांची आज कामाला दांडी!

Bihar election impact in Maharashtra: बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील लोकांना देखील लागली आहे. त्यामुळे जे मुळचे बिहारी आहेत त्यांना तर याची उत्सुकता किली असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यामुळेच महाराष्ट्रात काम करणाऱ्या बिहार राज्यातील कामगारांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर आज चक्क दांडी मारली आहे.

Sampat Devgire

Impact of Bihar election results on migrant workers in Maharashtra: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. निवडणूक बिहारची असली तरी नाशिक शहरात त्याची वेगळ्याच कारणाने मोठी उत्सुकता आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

कालपासूनच याबाबत औद्योगिक क्षेत्रातील बिहार राज्यातील कामगार आणि कंत्राटदार यांच्यात त्याची जोरदार चर्चा होती. त्यामुळे अनेकांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर चक्क दांडी मारली आहे. नाशिक शहरातील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीसह अन्य भागात हजारो बिहार राज्यातील कामगार आणि मजूर वास्तव्यास आहेत.

सातपूर भागात या मतदारांचा मोठा प्रभाव आहे. विधानसभा निवडणुकीत त्यासाठी लालूप्रसाद यादव यांसह अनेक बिहारच्या राजकीय नेत्यांच्या सभा देखील होत असतात. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत यंदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचाराचा धुराळा उडवला. त्यामध्ये मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धती यावर टीका झाली.

व्होट चोरी हा या निवडणुकीतील प्रमुख विषय आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी त्याची चर्चा होणारच. त्यामुळे निवडणूक बिहारची, मतमोजणी बिहारला मात्र उत्सुकता नाशिक शहराला अशी स्थिती आहे. अनेक वाहिन्यांनी देखील निवडणुकीचा निकाल दाखविण्यासाठी खास व्यवस्था केली आहे.

काही औद्योगिक संस्थांनी देखील याबाबत कामगारांना यासंदर्भात सैल धोरण ठेवले आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे देशाच्या राजकारणावर देखील गंभीर पडसाद उमटण्याची चिन्हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त जनता दलाचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दृष्टीने हा राजकीय भवितव्याचा विषय आहे.

तो थेट महाराष्ट्रातील गल्लीबोळातील बिहारच्या स्थलांतरित मजूर आणि कामगारांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक महाराष्ट्रासह नाशिक शहरात विशेष चर्चेत आहे. अनेकांना या निकालाची मोठी उत्सुकता आहे. नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत व्यस्त झालेले राजकीय कार्यकर्ते आणि नेते यांच्या तोंडी देखील बिहारमध्ये काय? हीच चर्चा आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT