Bihar Election Result update : आज ‘या’ मतांची होणार नाही मोजणी; कोण आहेत हे मतदार, निकालावर काय परिणाम?

Tender Votes Counting in Bihar Election : टेंडर मतांची मोजणी नियमित मतांसोबत केली जात नाही. दोन उमेदवारांना पडलेली मते सारखी असल्यास किंवा दोघांच्या मतांमधील अंतर नगण्य असल्यास कोर्टाच्या आदेशानंतर या मतांची मोजणी होते.
Bihar Election Result 2025
Bihar Election Result 2025Sarkarnama
Published on
Updated on

Bihar election update : बिहार विधानसभा निवडणुकीचा आज फैसला होणार असून कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा करिष्मा कायम राहणार की राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या जोडीचा बोलबाला असणार, हे काही तासांत स्पष्ट होईल. पण त्याआधी मतमोजणीदरम्यान काही मतांची मोजणी होणार नाही, याबाबत जाणून घेऊयात.

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी होते. त्यानंतर 30 मिनिटांनी ईव्हीएमची मतमोजणीही सुरू केली जाते. बिहारच्या निवडणुकीपासून टपाली मतांची मोजणी पूर्ण झाल्याखेरीज ईव्हीएम मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण करता येणार नाहीत. ईव्हीएम मतमोजणी अखेरच्या दोन फेऱ्या सुरू होण्याआधी टपाली मतांची मोजणी पूर्ण करणे आवश्यक असेल.

अशी काही मतेही आहे, ज्यांची मोजणी संपूर्ण मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरही केली जात नाहीत. मग या मतांची मोजणी कधी होते, ही कोणती मते आहेत, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. या मतांची मोजणी नियमित मतमोजणीमध्ये केली जात नाही. काही विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यासच त्यांची मोजणी केली जाते. अनेकदा न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग या मतांची मोजणी करते. तोपर्यंत ही मते सीलबंद असतात.

Bihar Election Result 2025
Bihar Election 2025: बिहारच्या जात राजकारणाचं गणित तेजस्वी यादवांच्या पथ्यावर पडणार? कसा होऊ शकतो फायदा?

कोणती आहे ही मते?

मतदार मतदान केंद्रावर जातात, तेव्हा त्यांच्या नावावर दुसरेच कुणीतरी मतदान करून गेले आहे, असे लक्षात येते. अशावेळी संबंधित मतदाराबाबत खात्री करून केंद्रातील निवडणूक अधिकारी त्यांना बॅलेट पेपरवर मतदान करण्याची परवानगी देतात. तो मतदारांचा अधिकार असतो. या मतांना ‘टेंडर वोट’ म्हणतात. हे विशेष बॅलेट पेपर सीलबंद ठेवले जातात.

टेंडर मतांची मोजणी नियमित मतांसोबत केली जात नाही. दोन उमेदवारांना पडलेली मते सारखी असल्यास किंवा दोघांच्या मतांमधील अंतर नगण्य असल्यास कोर्टाच्या आदेशानंतर या मतांची मोजणी होते. प्रत्येक निवडणुकीत अशी टेंडर मते असतीलच असेही नाही. निवडणूक संचलन नियम, 1961 मधील कलम 56 नुसार टेंडर मते नियमित मतमोजणीमध्ये घेतली जात नाही. ती अखेरपर्यंत सीलबंद ठेवली जातात.

Bihar Election Result 2025
Bihar Election Result : बिहारचा निकाल मोठा धक्का देणार? महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा, एक्झिट पोलही ठरतील फेल...

द हिंदूच्या रिपोर्टनुसार, 2008 मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर टेंडर मतांची मोजणी करण्यात आली होती. काँग्रेसचे उमेदवार सी. पी. जोशी आणि भाजपचे कल्याण सिंह चौहान यांच्यामध्ये केवळ एका मताचे अंतर होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर टेंडर मतांची मोजणी करण्यात आली होती. या निवडणुकीत कल्याण सिंह यांचा विजय झाला होता. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com