Keda Aaher Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : नाशिक लोकसभेसाठी आता केदा आहेरांची एन्ट्री

BJP Politics : भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Arvind Jadhav

Nashik Political News :

नाशिक लोकसभा मतदारसंघात अजून ना महायुतीने उमेदवार जाहीर केला आहे ना महाविकास आघाडीने. तरीही महायुतीमधून भाजप या मतदारसंघासाठी आग्रही आहे. त्यामुळे चुरस वाढतच चालली आहे. विशेषत: भाजपकडून उमेदवारीवर दावा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून, त्यात आता नाशिक लोकसभा निवडणूक प्रमुख केदा (नाना) आहेर यांच्या नावाची जोड मिळाली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नावामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Loksabha Constituency) शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळणार, की भाजपला हे अद्याप स्पष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सुद्धा या घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहेत. मात्र, या वेळी भाजप (BJP) नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी खूपच आक्रमक आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकवण्यासाठी भाजप अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. ही संधी या वेळी चालून आली असून, संधीचे सोने करण्यासाठी भाजप कोणत्या उमेदवारास चाल देणार याची उत्सुकता आहे. (Loksabha Election)

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर (Keda Aaher) यांची नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षविस्तारासह निवडणुकीच्या रणनीतीची जबाबदारी आहेर यांच्या खांद्यावर आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून आहेर यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, आता केदा आहेरच लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

कोण आहेत केदा आहेर?

केदा आहेर यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. विसाव्या वर्षी सरपंच म्हणून काम सुरू केलेल्या आहेर यांच्याकडे माजी मंत्री दौलतराव आहेर यांचा राजकीय वारस आहे. आहेर यांनी जिल्हा परिषदेमध्ये कृषी विभागाचे सभापती म्हणून काम पाहिले. जिल्हा बँकेच्या कामाचाही त्यांचा अनुभव आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दा आहेर यांच्या नावाच्या चर्चेमुळे भाजपकडून मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. याबाबत आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नाशिक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा ही सर्वांची मागणी आहे.

जागा मिळणार की नाही इथपासून सुरुवात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक असल्याची चर्चा आहे. यात काहीही विशेष नाही. पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाते, ती निभावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. पक्षाने सांगितले की, तुम्हाला निवडणूक लढवयाची आहे तर मी यासाठी तयार आहे. मात्र, याचा सर्वस्वी निर्णय पक्षच घेईल. पक्षाने तिकीट दिले तर ठीक, अन्यथा माझी जबाबदारी मी पार पाडणारच आहे, असे आहेर यांनी स्पष्ट केले.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT