MLA Devyani Pharande & Seema Hirey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप महिला आमदारांची फुगडी रंगली!

Sampat Devgire

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) बांठिया आयोग स्वीकारत महाराष्ट्रात (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना (OBC) राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने त्या समर्थनार्थ भाजपच्या (BJP) कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत, ढोल- ताशाच्या तालावर नृत्य केले. (Nashik Bjp mla welcomes political reservation for OBC)

महिला पदधिकाऱ्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. महायुतीमुळेच आरक्षण मिळाल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरक्षण मिळवून देण्यात मोठा वाटा आहे. ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, ही भाजपची भूमिका सुरवातीपासून होती.

ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका यापूर्वी जाहीर केली होती. आता ओबीसींना मिळालेले आरक्षणाचे श्रेय महाविकास आघाडीकडून घेतले जात आहे. मात्र, या समाजाला आरक्षण कोणामुळे मिळाले हे अवगत असल्याने त्यांचे प्रयत्न वाया जातील, असा टोला आमदार फरांदे यांनी लगावला.

नाशिकमध्ये ओबीसींचे अनेक नेते आहे, परंतु आरक्षणासाठी कोणीही काहीही केले नाही. देवेंद्र फडणीस यांनी ओबीसींना आरक्षण मिळवून देण्याचा शब्द दिला होता. आरक्षण न मिळाल्यास राजकारण सोडून, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, त्यांनी आता तो शब्द खरा करून दाखवला, असे मत आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केले.

या वेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश सचिव रोहिणी नायडू, ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष चंद्रकांत थोरात, प्रतिभा पवार, शिवाजी बरके आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT