NCP Agitaion in Nashik, Nashik Latest Marathi News, NCP News, Political News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार खरेदीचा खर्च मोदी जनतेकडून वसुल करीत आहे!

स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे नाशिकमध्ये आंदोलन

Sampat Devgire

नाशिक : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत केंद्र सरकारकडून (Centre Government) ५० रुपयांनी वाढ केली. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे (Prerana Balkavde) व शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी केंद्र शासनाच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत डोक्यावर लाकडाची मोळी व गोवऱ्या घेऊन सरकारचा निषेध केला. (NCP Women`s wing agitation against LPG cylinder price hike)

केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केल्याने १४. २ किलोच्या सिलिंडरसाठी नागरिकांना १ हजार ०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरने हजाराचा आकडा पार केल्याने सर्वसामान्य गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. या दरवाढीला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.(Nashik Latest Marathi News)

महिला आंदोलकांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करत ‘महागाईवर हल्लाबोल’, ‘महंगा सिलिंडर हल्लाबोल’, ‘बहोत हुई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्व सामान्य जनतेला गॅस परवडणार नाही म्हणून आंदोलकांकडून लाकडाच्या मोळी व गोवऱ्या भेट देण्यात आल्या.

या वेळी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, भारती भोई, वर्षा लिंगायत, सरिता पगारे, योगिता आहेर, सुरेखा पठाडे, संगीता पाटील , सुवर्णा गांगोडे, शीतल भोर, संगीता राऊत, भारती खिरारी, ज्योती भोर, मंगल माळी, सुरेखा कुऱ्हाडे, रूपाली अहिरे, निशा झनके, रूपाली तायडे, वैशाली ठाकरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

राज्यातील बंडखोर आमदारांवर केलेला खर्च मोदी सरकार सामान्यांकडून वसूल करत आहे. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करत मोदी सरकारने एकप्रकारे गृहिणींच्या माथी लाकडाची मोळी लादली आहे.

- प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT