Dhule Municiple Corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Dhule News : भाजप नगरसेवकांचे भवितव्य चक्क सफाई कर्मचाऱ्यांच्या हाती?

BJP corporators appeal to corporation employee-हतबल भाजपचे नगरसेवक म्हणतात, तुम्ही काम केले तरच आम्ही निवडून येऊ.

Sampat Devgire

Dhule BJP News : महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या नगरसेवकांचा आता स्वतःचा आत्मविश्वास, केलेले कामकाज यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीसाठी चक्क सफाई कर्मचाऱ्यांना विणवणी सुरू केली आहे. (Corporation took a meeting of health department employees)

भाजप (BJP) नगरसेवकांनी केलेल्या या विणवणीची शहरभर चर्चा आहे. विकासकामांचा दावा करणाऱ्या धुळे (Dhule) महापालिकेच्या भाजपच्या नेत्यांनी चक्क कर्मचाऱ्यांना विणवणी केली आहे. असा प्रकार अन्यत्र कुठे ऐकीवात नाही.

धुळे शहरातील स्वच्छता, सफाईचे कंत्राट व कंत्राटदारापासून तर विविध प्रकारच्या कामकाजाची अनेक उदाहरणे सतत चर्चेत असतात. यापूर्वी नागरिकांनी नगरसेवकांना सफाई होत नसल्याने खडे बोल सुनावले होते. त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने महापालिकेचे कामकाज चव्हाट्यावर आले होते.

हा विषय पुन्हा चर्चेला येण्याचे कारण म्हणजे काल महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा मेळावा महापालिकेच्या पुढाकाराने झाला. या मेळाव्याला महापौर प्रतिभा चौधरी, भाजपचे शहर अध्यक्ष राजेंद्र अंधळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, सभागृहनेत्या भारती माळी यांसह विविध प्रमुख नगरसेवक उपस्थित होते. शहरातील सार्वजनिक स्वच्छता व शौचालयांबाबत आढावा आणि उपाययोजना यासाठी ही बैठक होती.

यावेळी नगरसेवकांनी अक्षरशः कर्मचाऱ्यांना विणवणी केली. नगरसेवक म्हणाले, शहराच्या व नागरिकांच्या दृष्टीने सफाई हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. नागरिकांची खुप बोलणी ऐकावी लागतात. त्यादृष्टीने चांगले काम होणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही चांगले काम केले. मात्र आता निवडणुका चार-पाच महिन्यावर आल्या आहेत. तुम्ही चांगेल काम केले तरच आम्ही निवडून येऊ.

यावेळी महापौरांनी शहरात दररोज स्वच्छता रहावी यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा. दरमहा सर्व्हेक्षण करावे. चांगले काम असलेल्या विभागातील स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना एकवीस हजाराचे बक्षीस देण्यात यावे, अशा विविध सूचना केल्या मात्र सामान्यतः विकासकामे, लोकोपयोगी कामे, जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या आधारे नगरसेवक निवडणुकीत उतरतात. धुळेमहापालिकेत मात्र सत्ताधारी नगरसेवकांचा हा आत्मिवश्वासच राहिलेला नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT