Jalgaon Municipal Commissioner: आयुक्त विद्या गायकवाड यांचे अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्यांना खडे बोल!

Jalgaon Municipal Commissioner Vidya Gaikwad News- महापालिका आयुक्तांनी अविश्वास आणणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांचे मुद्दे फेटाळले.
Vidya Gaikwad
Vidya GaikwadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon BJP Politics : जळगाव महापालिकेच्या आयुक्तांवर अविश्वास आणण्यात भाजप नगरसेवकांचा पुढाकार होता. त्यात त्यांनी जी कारणे दिली ती सर्व महापालिका आयुक्तांनी फेटाळली आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत असा दावा त्यांनी केला. (There are devolopment works in large scale is going on in the city)

जळगाव (Jalgaon) महापालिका आयुक्त विद्या गायकवाड (Vidya Gaikwad) यांच्या विरोधात भाजपच्या (BJP) पुढाकाराने आणि शिवसेनेच्या (Shivsena) मदतीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

Vidya Gaikwad
Jalgaon BJP Politics: गिरीष महाजनांचा भाजप नगरसेवकांवरच अविश्वास?

मंगळवारी महापालिका सभा तहकूब झाल्यानंतर आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव बारगळला. त्यासाठी आयुक्तांनी बदलीचा प्रस्ताव दिला होता, असे देखील सांगितले जाते. मात्र महासभा तहकूब झाल्यावर आयुक्तांनी याबाबत आपली भूमिका मांडली. त्यात त्यांनी नगरसेवकांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

महासभेत दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाबाबत त्यांनी आपली भूमिका लिखीत स्वरूपात मांडली आहे. आपल्या दोन पानी पत्रात त्या म्हणाल्या, मी आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून शासकीय योजना, महापालिका निधी अंतर्गत होत असलेल्या कामांना मंजूरी दिली आहे. महापालिका निधी, दलितेतर वस्त्यांच्या विकासासाठी नवी कामे, दलीत वस्ती विकास योजना, नगरोत्थान योजनेतील कामे तसेच शहरातील मूलभूत सोयी सुविधांच्या निर्मिती आणि उभारणीवर भर दिला आहे.

Vidya Gaikwad
BJP Mission 48: लोकसभेसाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांची आज बैठक; फडणवीस देणार टीप्स

महापालिका आयुक्त गायकवाड म्हणाल्या, विविध योजनेतून ८२.४१ कोटींची कामे सध्या मंजूर आहेत. त्यावर काम सुरू आहे. शहरात अमृत योजनेतील ७५ हजारांपैकी ३७ हजार नळकनेक्शन पाणीपुरवठा कामे सुरू केल्या आहेत. येत्या दोन महिन्यांत ही कामे पूर्ण होतील. त्यामुळे नगरसेवकांनी विकासकामांत अडथळा आणला हा दावा बरोबर नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.